मुंबई : सुप्रसिद्ध गायिका आणि भारताची गाण कोकीळा लता मंगेशकर यांना कोरोना विषाणूची लागण झाली, यामुळे त्यांना मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 92 वर्षीय गायीका लता मंगेशकर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहेत. या घटनेची माहिती लता मंगेशकर यांची भाची रचनाने ANI ला दिली. तिने ANI बोलताना सांगितले की, त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत.
लता मंगेशकर यांचे वय आणि इतर आरोग्य समस्या पाहता, डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. ज्यामुळे त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले आहे. अशी सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी लता दीदींची प्रकृती ठिक असल्याचे सांगितले आहे.
लात दीदी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीमुळे त्यांना यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची धाकटी बहीण उषा यांनी लता दिदींना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे सांगितले होते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गान कोकीळा लता मंगेशकरने यांनी त्यांचा 92 वा वाढदिवस त्यांच्या जवळच्या कुटुंबियांसोबत साजरा केला. सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्यावर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लता मंगेशकर यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' आणि फ्रान्सचा 'सर्वोच्च नागरी पुरस्कार', तसेच 'ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' याशिवाय अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
1974 मध्ये, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना इतिहासातील सर्वात जास्त रेकॉर्ड आपल्या नावे केलेला कलाकार म्हणून स्थान दिले. त्यांनी 1948 ते 1974 दरम्यान 25 हजाराहून अधिक गाणी गायली होती.