मुंबई : शरीराच्या होणाऱ्या लाहीलाहीमुळे उन्हाळा कोणालाच आवडत नाही. मात्र असं असूनही उन्हाळा हवाहवासा वाटतो. त्याच कारण म्हणजे उन्हाळ्यात खायला मिळणारा फळांचा राजा अर्थात तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आंबा. भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे आंबे पाहायला मिळतात. या आंब्याची आता चीनला चटक लागली आहे. या आंब्याला मिळवण्यासाठी आता चीनने कुरापती करायला सुरुवात केली आहे. (Chinas eye on mangoes in India)
आंब्याचा भारतातील इतिहास
भारतातील आंब्याचा इतिहास फार जूना आहे. आंब्याचा किमान 4 हजार वर्ष जूना इतिहास आहे. भारतच आंब्याची जन्मभूमी आहे. आजही मोठ्या प्रमाणात भारतातून परदेशात आंबे पाठवले जातात. आशिया खंडातील विविध देश हे भारताने पाठवलेल्या आंब्यांची चव चाखत आहेत. खऱ्या अर्थाने 14 व्या शतकात आंबा भारताबाहेर गेला. पण आंबा चीनमध्ये 20 व्या शतकापासून पोहचला.
जेव्हा चीनने चाखली आंब्याची चव
चीनमध्ये आंबा पोहचण्याची रंजक गोष्ट आहे. 1968 मध्ये तत्कालीन पाकिस्तानचे मंत्री सय्यद शरीफुद्दीन पीरदाजा हे ऐन उन्हाळ्यात बीजिंगला गेले होते. त्यामुळे बीजिंगला जाताना पीरदाजा सोबत तब्बल 40 आंब्याच्या पेट्या भेट म्हणून घेऊन गेले होते. तेव्हा चीनमधील नागरिकांना आंब्यांबाबत काहीच माहिती नव्हती. यावेळेस हे आंबे माओंनी कामगार नेत्यांना पाठवले. हे कामगार नेते त्या वेळेस सिन्हुआ विश्वविद्यालयात ठाण मांडून बसले होते.
अन आंबा ठरला माओंच्या प्रेमाचं प्रतिक
कॉम्रेड माओकडून कामगार नेत्यांना मिळालेली अनोखी भेट होती. त्यामुळे या कामगार नेत्यांनी आंब्यांच्या पेट्या बीजिंगमधील कंपन्यांमध्ये पाठवून दिल्या. कंपनीतील प्रत्येक कामगाराला आंब्याची चव चाखता आली नाही. पण इथूनच खऱ्या अर्थाने चीनमध्ये आंबा नावारुपास आला. अशा प्रकारे आंबा माओंच्या प्रेमाचं प्रतिक ठरलं.
आज चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. भारत आंब्याची जन्मभूमी आहे. मात्र सर्वाधिक आंबा उत्पादनाबाबत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारत अव्वलस्थानी कायम आहे.
गुणवत्ता आणि इतर बाबतीतही भारत आघाडीवर आहे. मात्र निर्यातीसाठी चीनकडे जे साधनं आहेत, तीच साधनं भारताकडे नाहीत. दरम्यान फिलीपाईन्सही भारताला आंब्यांच्या बाबतीत टक्कर देण्याच्या तयारीत आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अजूनही यश आलेले नाही.
अन्न आणि कृषी संस्थेच्या आकडेवारीनुसार जगभरात 5 कोटी टनपेक्षा अधिक आंब्याचं उत्पादन होतं. यापैकी केवळ 2 कोटी टन आंब्याचं उत्पादन हे एकट्या भारतात होतं. तर चीनची हीच आकडेवारी 50 लाख टन इतकी आहे. तर यानंतर थायलंड, इंडोनेशिया आणि मॅक्सिकोचा क्रमांक लागतो. याचाच अर्थ असा की जगातील दर 10 आंब्यांपैकी 4 आंबे हे भारताचे असतात.
15 वर्षांआधी अमेरिकाने भारतावर आयात करण्यास बंदी घातली होती. अधिक कीटकनाशकांच्या वापरामुळे अमेरिकेने ही बंदी घातली होती. पण आता हे प्रकरण निकाली निघालं आहे. भारतातील आंब्यांना सर्वाधिक मागणी ही पश्चिम आशियातून आहे.
संबंधित बातम्या :
नेतन्याहू यांच्या विरोधात 8 पक्ष एकत्र, 13 वर्षानंतर इस्राईला मिळणार नवा पंतप्रधान