चीनकडून सोन्याचा शोध, भारताची डोकेदुखी

चीनने अरूणाचल प्रदेशाला लागून असलेल्या भारत-चीन सीमेवर एक खाण शोधली आहे

Updated: May 21, 2018, 06:33 PM IST
चीनकडून सोन्याचा शोध, भारताची डोकेदुखी title=

नवी दिल्ली : चीनने अरूणाचल प्रदेशाला लागून असलेल्या भारत-चीन सीमेवर एक खाण शोधली आहे, या खाणीत सोनं, चांदी आणि अनेक मौल्यवान खनिज पदार्थांचा शोध लागला असल्याचं सांगितलं जात आहे. या खाणीची किंमत ६ हजार कोटी डॉलरपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. चीनच्या ह्युन्जे प्रांतात ही खाण आहे, तसेच भारतीय सीमेला लागून हा भाग असल्याचं डेक्कन क्रोनिकल या दैनिकाने छापलं आहे. सोन्याची खाण याशिवाय आणखी एक धोकादायक गोष्ट देखील या दैनिकाने आपल्या बातमीत छापली आहे. चीनने त्याच्यापुढे जाऊन भारतासमोर आणखी एक डोकेदुखी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

चीनकडून धक्कादायक दावा

डेक्कन क्रोनिकलने ही बातमी छापताना चीनी दैनिक साऊथ चायना मॉर्निंग पोस्टचा संदर्भ दिला आहे, यातील रिपोर्टनुसार म्हटलंय की, चीनने भारताच्या अरूणाचल प्रदेशला लागून असलेल्या भागाला दक्षिण तिबेटचा भाग असल्याचं म्हटलं आहे. रिपोर्टनुसार चीनने या खाणीच्या प्रोजेक्टसाठी चीनच्या दक्षिण भागात येणाऱ्या नैसर्गित साधन संपत्तीमुळे आपला हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे.