कास्टिंग काऊच : काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांचं देखील वादग्रस्त वक्तव्य

Updated: Apr 24, 2018, 07:35 PM IST

नवी दिल्ली : संसदेतही कास्टिंग काऊच होतं, असं खळबळजक वक्तव्य काँग्रेस नेत्या रेणूका चौधरी यांनी केलं आहे. कास्टिंग काऊच सगळ्याच क्षेत्रात होतं, फक्त बॉ़लिवूड इंडस्ट्रीत नव्हे, असं वक्तव्य प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना रेणुका चौधरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान सरोज खान यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.