Car Buying Tips: पैसे असे करा सेव्ह... एक काय पाच कार घ्याल! जाणून घ्या 'ही' ट्रीक

Saving tips for Buying Car: अनेकदा गाडी खरेदी करताना आपल्याला अनेक सेवासुविधा या मिळत असतात. त्यामुळे आपल्याला अधिकीचे पैसेही द्यावे लागतात, परंतु कार खरेदी करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या टीप्स लक्षात ठेवायच्या आहेत. 

Updated: Feb 9, 2023, 07:46 PM IST
Car Buying Tips: पैसे असे करा सेव्ह... एक काय पाच कार घ्याल! जाणून घ्या 'ही' ट्रीक title=

Saving tips for Buying Car: आपण आपल्या अनेक गरजांसाठी पैसे साठवण्याच्या मार्गावर असतो. त्यातून या सेव्हिंग्समुळे (Saving) आपल्याला कायमच चांगला फायदा होत आला आहे. त्यामुळे आपल्या पगारातून (Salary) चांगली सेव्हिंग्स करणं कधीही फायदेशीर ठरतं. सगळ्यांचीच मोठी मोठी स्वप्न असतात. त्यात सर्वात म्हत्त्वाचं स्वप्न म्हणजे घरं खरेदी करण्याचं आणि दुसरं म्हणजे अर्थात कार खरेदी करण्याचं. त्यामुळे आपल्याला त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते. यासाठी आपण आपल्या पगारातून काही पैसे सेव्ह करतो नाहीतर कुठल्यातरी विमा पोलिसीतून (Car Loan) कार लोनही घेतो. परंतु लोन घेतले तरी तुम्हाला ते फेडावे लागते. पण त्याऐवजी तुम्ही पैशांची सेव्हिंग करू शकता त्यामुळे आजपासूनच आपल्या पगारातून बचत सुरू करू शकता. (Car Buying Tips follow these tips to buy car while having negotiation with car seller how to save money)

मग त्यातूनही सर्वात महत्त्वाचा मार्ग असतो तो म्हणजे कार खरेदी करतानाच्या वाटाघाटीचा. आपल्याला कार खरेदी करणं अनेकदा कठीण जातं कारण आपल्याला त्याच्यामागे कार खरेदी करताना नक्की काय लक्षात ठेवायला हवे हे समजत नाही. तेव्हा आपल्याला अशा काही गोष्टी जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते. कार खरेदी करताना आपण कशा वाटाघाटी करू शकतो याकडे बारकाईनं लक्ष देणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्यालाही अनेकदा समोरच्या कार विक्रेत्याकडून कार विकत घेताना नक्की कशा वाटाघाटी (Negotiation) कराव्यात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हा खालील गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

अनेकदा गाडी खरेदी करताना आपल्याला अनेक सेवासुविधा या मिळत असतात. त्यामुळे आपल्याला अधिकीचे पैसेही द्यावे लागतात, परंतु कार खरेदी करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या टीप्स लक्षात ठेवायच्या आहेत. ज्यानं तुम्ही फार चांगल्याप्रकारे समोरच्या माणसाची वाटाघाटी करू शकता आणि त्यानूसार तुम्हीही पैशांची बचत करू शकता. तेव्हा जाणून घ्या या महत्त्वाच्या टीप्स. 

1. आपल्या कधीही कोणत्याही कारची फायनल डील करायची असेल तर आपण याचा नीट विचार करायला हवा. शोरूममधल्या गाडीच्या किमतीचा नीट विचार करा आणि मग त्यापद्धतीनं जे चार्जेस तुम्हाला अनावश्यक वाटतात ते काढून टाकू शकता. त्याचबरोबर जर का आपण हे नीट समजून घेतलं तर आपल्याला आपले पैसे सेव्ह करता येतील. 

2. कार खरेदी करताना तुम्ही कार विक्रेत्याकडे डिस्कांऊट मागवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला याचा फायदाही घेता येतील. तुम्ही तुम्हाला दिलेल्या ऑफरचा आधी व्यवस्थित विचार करू शकता पण जर का ती तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही त्यावर डिस्कांऊटही घेऊ शकता. 

3. कारसोबत मिळणाऱ्या इतरत्र काहीही कामाच्या नसणाऱ्या वस्तू खरेदी करू नका. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)