लखनऊ : उत्तर प्रदेशच्या कन्नौज येथे एका अपघातात २० जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. धडक लागल्यानंतर बसने पेट घेतला. शुक्रवारी रात्री कन्नौज जिल्ह्यातील देवर मार्गावरुन बस जयपूरकडे जात असताना ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कमीतकमी २० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तथापि, मृतांचा आकडा वाढण्याची भिती वर्तविण्यात आली आहे.
प्रवासी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू झाला. कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला ही बस जात होती. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून जखमींना ५० हजार रूपये तर मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
Kannauj: A bus carrying 50 passengers catches fire after collision with a truck on GT Road. Fire tenders have rushed to the spot. More details awaited pic.twitter.com/aRdZC8ElhG
— ANI UP (@ANINewsUP) January 10, 2020
ट्रक आणि बसच्या अपघातानांतर बसला आग लागली. आग भडकल्याने अनेक प्रवाशांना बसमधून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे अनेक जण होरपळे आणि यात त्यांचा मृत्यू झाला. आगीमुळे बसमधील प्रवाशांना बाहेर पडणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. यामध्ये २० प्रवशांचा मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
दरम्यान, कन्नौज जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये किमान ४३ लोक प्रवास करीत होते आणि २१ जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांना वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने आग आटोक्यात आणली. किमान २५ प्रवाश्यांची सुटका करण्यात आली.