Viral Video : 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल, अशा मित्रापेक्षा तर शत्रुच बरा

तुम्ही हे ऐकलं आणि ते बऱ्याचदा अनुभवलं देखील असेल की, 'हर एक फ्रेंड कमीना होता है'.

Updated: Jun 20, 2022, 07:40 PM IST
Viral Video : 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल, अशा मित्रापेक्षा तर शत्रुच बरा title=

मुंबई : आपण मैत्रीच्या अनेक कहाण्या ऐकल्या आहेत. मैत्रीसाठी लोक काहीही करण्यासाठी तयार होतात. मित्र सुख दुखं दोन्हीत साथ देतात. परंतु तुम्ही हे देखील ऐकलंच असेल की, 'हर एक फ्रेंड कमीना होता है' आणि तुम्ही ते बऱ्याचदा अनुभवलं देखील असेल. असे काही मित्र असतात जे आपल्या मित्राला संकटातून बाहेर काढायला मदत करतात. तर काही मित्र हे आपल्यासोबत आपल्या मित्राला देखील संकटात टाकतात. परंतु असं असलं तरी त्यांची मैत्री काही कमी होत नाही.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल की, 'हे देवा असा मित्र कोणाला नको देऊ.' खरंतर हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका तरुण आपला हात चूकून तव्यावर ठेवतो. परंतु तो तवा गरम असल्यामुळे त्याचा हात भाजतो. परंतु असे असले तरी हा तरुण आपला हात भाजला म्हणून आपल्या मित्रासोबत देखील अशी गंमत करण्याचा विचार करतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा तरुण आपल्या मित्राचा हात त्या गरम तव्यावर ठेवतो आणि तो काही सेकंद त्याचा हात तसाच धरुन ठेवतो. ज्यामुळे त्याचा मित्राचा देखील हात भाजतो. ज्यानंतर हा मित्र या तरुणाला मारण्यासाठी त्याच्या मागे लागतो. हा खूपच मजेदार व्हिडीओ आहे.

लोकांच्या आयुष्यातही असे मित्र असात ज्यांना त्यांना असा त्रास दिला असणार किंवा दुसऱ्या मित्रांना त्यांनी असा त्रास दिला असणार. या व्हिडीओला लोकांना आपल्या खऱ्या आयुष्याशी जोडलं आहे. ज्यामुळे लोकांना हा व्हिडीओ फारच जवळचा वाटत आहे. म्हणून हा व्हिडीओ ट्रेंड होत आहे.