Delhi Metro Viral Video: 'चोली के पीछे क्या है' गाण्यावर पोरानं लगावले ठुमके; तरुणाचे नखरे एकदा बघाच!

Delhi Metro Dance Video: दिल्ली मेट्रोशी संबंधित एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण खलनायक चित्रपटातील चोली के पीछे क्या है या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Updated: Aug 20, 2023, 06:38 PM IST
Delhi Metro Viral Video: 'चोली के पीछे क्या है' गाण्यावर पोरानं लगावले ठुमके; तरुणाचे नखरे एकदा बघाच!  title=
Choli Peechey Kya Hai Video

Delhi Metro Dance Video: देशातील सर्वात अतरंगी ठिकाण बनलंय ते दिल्ली मेट्रो. राजधानी दिल्लीला (Delhi News) खरीखुरी ओळख मिळाली ती मेट्रोमुळे. मुंबईसाठी जशी लोकल तशी दिल्लीसाठी मेट्रो (Delhi Metro). मात्र, आता दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसून आलं आहे. कोणी मेट्रोमध्ये अश्लिल चाळे करतंय तर कोणी मेकअप. कोणाला डान्स करण्याचा मुड होतो, तर कोणाला गाणं म्हणावं वाटतंय. अशातच आता दिल्ली मेट्रोतील एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपल्या भन्नाट अदा सादर करताना दिसतोय.

दिल्ली मेट्रोशी संबंधित एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण खलनायक चित्रपटातील चोली के पीछे क्या है या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. डीएमआरसीने (DMRC) चेतावणी दिल्यानंतर देखील नागरिक खुलेआम चेतावणीचे उल्लंघन करताना दिसत असतात. अशातच आता तरुणाने देखील मेट्रोमध्ये डान्स करत नियम पायदळी तुडवले.  व्हायरल व्हिडिओमध्ये, एक मुलगा गाण्यावर नाचत असताना इतर लोक त्या माणसाच्या डान्सचा व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे नाचायला लावतात. त्यावेळी त्याचे ठुमके पाहून अनेकांना हसू आवरणार नाही. 

डीएमआरसीने मेट्रोमध्ये चुंबन घेणं, पोल डान्स, ब्रेक डान्स आणि बिकिनी मुलींसारख्या घटनांना तोंड देण्यासाठी आणि रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रील्स बनवण्यासाठी दंडात्मक तरतूद केली होती. मात्र त्यानंतरही मेट्रोमध्ये आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by DU Updates (@duupdates)

दरम्यान, दिल्ली मेट्रो कपलसाठी अश्लील चाळे करण्याचा अड्डा झालाय, त्यामुळे आता दिल्ली पोलीस गस्त घालणार असण्याचं सांगण्यात आलंय.  डीएमआरसीने याप्रकरणी कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर दिल्ली पोलीस (Delhi Police) अॅक्शन मोडवर आली आहे.