तुझे तुकडे तुकडे करेन, भाजप महिला नेत्याची काँग्रेसच्या मंत्र्याला धमकी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा रणरंग्राम जोरात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेस मंत्र्याला भाजपाच्या एका महिला नेत्याने जीवे मारण्याची जाहीर धमकी दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. तुझे तुकडे तुकडे करुन तुरुंगात जायला घाबरणार नाही, अशी थेट धमकी जाहीर कार्यक्रमात व्यासपिठावरुन दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 31, 2018, 11:19 PM IST
तुझे तुकडे तुकडे करेन, भाजप महिला नेत्याची काँग्रेसच्या मंत्र्याला धमकी title=
छाया सौजन्य : Asianet Newsable

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा रणरंग्राम जोरात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेस मंत्र्याला भाजपाच्या एका महिला नेत्याने जीवे मारण्याची जाहीर धमकी दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. तुझे तुकडे तुकडे करुन तुरुंगात जायला घाबरणार नाही, अशी थेट धमकी जाहीर कार्यक्रमात व्यासपिठावरुन दिली.

जीवे मारण्याची धमकी 

कर्नाटकमधील भाजपच्या नेत्या दिव्या हगरग्गी यांनी काँग्रेसचे मंत्री एम.बी.पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी तुझी खांडोळी करीन आणि तुरूंगात जायला घाबरत नाही, धमकीचा इशाराच दिला. त्यांनी दिलेल्या धकमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 तुम्ही धर्मांत हस्तक्षेप केला

दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने अनेक कार्ड बाहेर काढलीत. त्यापैकी लिंगायत समाजाला देण्यात आलेला अप्लसंख्यांक दर्जा. काँग्रेसने लिंगायत समाजाला अल्पसंख्यांक दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर हगरग्गी यांनी एम बी पाटील यांनी ही धमकी दिली. जर तुमच्यात हिंमत असेल तर वीरशैव महासभेत या. तुम्ही आमच्या धर्मांत हस्तक्षेप केला आहे, हे लक्षात ठेवा. आम्हाला कुठल्याही पुरूषाच्या मदतीची गरज नाही. आम्ही महिलाच तुम्हाला उत्तर देण्यास सक्षम आहोत. असे सांगतानाच तुमची खांडोळी करु आणि तुरुंगात जाऊ, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे येथील राजकीय वातावरण अधिक तापलेय.