भाजपच्या आमदाराचा वादग्रस्त व्हीडीओ व्हायरल

संजय पाटील यांच्या भाषणचा एक व्हिडिओ सध्या कर्नाटकात चांगलाच व्हायरल झाला आहे.

Updated: Apr 20, 2018, 05:27 PM IST

बंगळुरू : कर्नाटकची निवडणूक पायभूत सुविधा आणि विकासाच्या मुद्द्याविषयी नसून, निवडणूक हिंदू विरुद्ध मुसलमान, अशीच असल्याचं खळबळजनक विधान भाजपचे विद्यमान आमदार संजय पाटील यांनी केलंय. याविधानामुळे पाटील यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. बेळगाव जिल्ह्यातील मारीहाळ पोलिस स्टेशन मध्य दोन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या बद्दलचा गुन्हा दाखल झाला आहे. संजय पाटील यांच्या भाषणचा एक व्हिडिओ सध्या कर्नाटकात चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत संजय पाटील एका छोटेखानी सभेत भाषण देताना दिसतायत. कानडी भाषेतल्या या भाषणात संजय पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. जे बाबरी मशीद बनवू इच्छितात, जे टीपू सुल्तानाची जयंती साजरी करू इच्छितात त्यांनी काँग्रेसला मतदान करावं, ज्यांना राम मंदीर बनवायचं आहे, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजा गौरव करायचाय त्यांनी मला नव्हे भाजपला मतदान करावं असं संजय पाटील यांनी भाषणात म्हटलं आहे.