कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता धर्मयुद्ध

कर्नाटक विधानसभा काबिज करण्यासाठी सर्व पक्षांनी धर्मयुद्ध सुरू केलंय.

Updated: Apr 20, 2018, 04:49 PM IST

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता धर्मयुद्ध सुरू झालं आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देऊन हिंदूंमध्ये फूट पाडल्याचा आरोप करत, ते हिंदू नसल्याची टीका केली आहे. या टीकेचा समाचार घेत सिद्धरामय्यांनी अमित शाह हे स्वत: हिंदू नसून जैन असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ते जर हिंदू असतील त्यांनी आपण जैन नव्हे हिंदू आहोत, असं जाहीर करण्याचं आव्हान सिद्धरामय्यांनी दिलं आहे. यालाही अमित शाहांनी प्रत्युत्तर देत आपण जैन नसून हिंदू वैष्णव असल्याचा दावा केलाय. त्यामुळं कर्नाटकाच्या विकासाच्या मुद्यावर सुरू झालेली ही निवडणूक आता धर्मावर येऊन ठेपली आहे.