नवी दिल्ली : एका भाजप नेत्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जम्मू-काश्मीर राज्याचे उपाध्यक्ष आशीष सरीन यांचा एके-47 रायफल सोबत फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरुन त्यांच्यावर टीका सुरु आहे. कायदा सुव्यवस्थेची नेतेच कशी पायमल्ली करतात याचं हे उदाहरण असल्याची टीका होत आहे.
भाजप नेते आशिष सरीन या विवादावर प्रतिक्रिया देतांना म्हटलं की, 'अनेक नेत्यांचे बंदुकीसोबत फोटो असतात. मी तर एक लोकल लीडर आहे. असं करण्यामागे माझा कोणताही चुकीचा उद्देश नव्हता. हा फोटो माझा भावाने अपलोड केला आहे.
सरीन यांच्यावर होणारी टीका ही युवा वर्गामुळे होत आहे. कारण सोशल मीडियावर युवा वर्ग सक्रीय असतो. अशा फोटोमुळे त्यांच्यामध्ये चुकीचा संदेश जाईल. एके-47 सारख्या अतिशय भंयकर अशा हत्यारासोबत फोटो टाकणं हे नक्कीच बेजबाबदारपणाचं वागणं आहे.