जयपूर: भाजपकडून राम मंदिराबाबत केवळ गवगवा केला जातोय, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली. ते रविवारी जयपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राम मंदिरावरून सुरु असलेल्या राजकारणावरून भाजपला धारेवर धरले. त्यांनी म्हटले की, राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत होऊन द्यायची असते. धर्म हा प्रत्येकाच्या खासगी जीवनाचा भाग आहे. मात्र, भाजपला प्रत्येक गोष्टीचा गवगवा करायची सवय आहे. त्यामुळेच भाजपचे वर्तन म्हणजे 'कसम गीता की, मंदीर हम वही बनायेंगे, पर तरीका नही बतायेंगे', असे दुटप्पी आहे. हाच भाजपचा खरा चेहरा आहे, अशी टीका सिंधिया यांनी केली.
J Scindia in Jaipur, Rajasthan: Politics shouldn't enter religion & religion should not enter politics. As far as religion of a person is concerned, it's his personal matter...BJP has the habit to make noise&say 'Kasam Gita ki, mandir hum wahin banaenge' par tareekh nahi bataenge pic.twitter.com/qY0xrntNp4
— ANI (@ANI) December 2, 2018
J Scindia in Jaipur, Rajasthan: This is BJP's reality. If they want to learn how to construct a temple, they should learn that from Scindia family, which made 60 temples across the state, including Rajasthan, UP & MP, Maharashtra but there was never a trouble between communities. https://t.co/3PmWWI4wOm
— ANI (@ANI) December 2, 2018
मंदिर कशी बांधायची हे भाजपने सिंधिया घराण्याकडून शिकावे. आम्ही राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जवळपास ६० मंदिरं बांधली. पण हे करताना कधीही दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाली नाही, असे सिंधिया यांनी सांगितले.