मुंबई: बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान याला काळवीट हत्या प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा झाली. जोधपूर न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यातील निकालाने सट्टा बाजारात मोठी उलथापालथ घडल्याचे पहायला मिळाली. तीन दिवसांच्या या खटल्याने सट्टा बाजारातील सर्व विक्रम मोडीत निघाले. अंतिम सुनावनी सुरू असल्याच्या शेवटच्या तीन दिवसांत सट्टा बाजारात सलमानवर तब्बल ३५०० कोटी रूपयांचा सट्टा लागला.
काळविट शिकार प्रकरणी सलमानला शिक्षा होणार हे नक्की झाल्यावर अनेकांची पावले सट्टा बाजाराकडे वळली. सट्टा लावणाऱ्यांपैकी अनेकांनी त्याच्या शिक्षेबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आणि त्यानुसार सट्टा लावला. पण, सट्टा बाजारातील सर्वच भविष्यवेत्त्यांना चकवा देत न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आणि सट्टा बाजार तोंडावर आपटला.