Cash Showered From Flyover: पूलावरुन उधळल्या नोटा! पैसे गोळा करायला तुफान गर्दी; Video झाला Viral

Showered Cash From Flyover: हा व्हिडीओ व्हायरल झाला असून पैसे उडवणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यात झोळी आणि घरामध्ये भिंतीवर लावलं जाणारं घड्याळ दिसत असून ही व्यक्ती ब्रिजवरुन नोटा खाली फेकत आहे.

Updated: Jan 24, 2023, 06:05 PM IST
Cash Showered From Flyover: पूलावरुन उधळल्या नोटा! पैसे गोळा करायला तुफान गर्दी; Video झाला Viral title=
showered cash from flyover

Cash Showered From Flyover: गुजरातनंतर आता कर्नाटकमधील (Karnataka) बंगळुरुमध्येही (Bengaluru) एक विचित्र घटना घडली आहे. एक व्यक्ती एका फ्लायओव्हरवरुन 10-10 रुपयांच्या नोटा उडवताना (Notes Showered from Flyover) दिसत आहे. अज्ञात व्यक्तीने मंगळवारी केआर मार्केट फ्लायओव्हरवरुन या नोटा फेकल्या. या नोटा जमा करण्यासाठी स्थानिक लोकांनी पूलाखालील रस्त्यावर गर्दी केली होती. यामुळे काही वेळ वाहतूककोंडीचा समस्याही निर्माण झाली. मात्र या व्यक्तीने असं कृत्य का केलं याबद्दल वेस्टर्न डिव्हीजन पोलीसांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तेथील तपास पूर्ण केल्यानंतर पोलीस आता या तरुणाचा शोध घेत आहेत. अशाप्रकारे दौलतजादा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हायरल व्हिडीओमध्ये अज्ञात व्यक्ती 10 रुपयांच्या नोटांचं बंडल हातात घेऊन उभी असल्याचं दिसत आहे. गळ्यामध्ये एक झोळी आणि भिंतीवर लावलं जातं ते घड्याळ या व्यक्तीने लटकवलेलं आहे. तसेच हातामध्ये नोटा घेऊन तो ब्रिजवरुन खाली फेकत असल्याचं दिसत आहे. कागदाचे तुकडे हवेत भिरकवल्याप्रमाणे तो या नोटा उधळताना दिसत आहे. या नोटा मिळवण्यासाठी अनेक स्थानिक लोकांनी ब्रिजखालच्या रस्त्यावर गर्दी केल्याचं दिसत आहे. यामुळे या रस्त्यावर मोठी गर्दी झाली. 

पोलीस काय म्हणाले?

या प्रकरणासंदर्भात बोलताना वेस्टर्न डिव्हिजनचे डीसीपी लक्ष्मण निम्बारगी यांनी या व्यक्तीने असं कृत्य का केलं यामागील कारण समजू शकलेलं नाही असं म्हटलं आहे. पोलिसांनी या तरुणाचा तपास सुरु केला आहे. नगर बाजार पोलिसांनी या ठिकाणी जाऊन पहाणी केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. 

गुजरातमध्ये उडवलेले 40 ते 50 लाख

एका महिन्यापूर्वी अशाप्रकारे गुजरातमध्येही एका व्यक्तीने नोटा उधळल्या होत्या. गुजरातमधील नवसारीमध्ये गुजरातमधील स्थानिक गायक कीर्तिदान गढवीने सादर केलेल्या भजनानंतर या ठिकाणी 40 ते 50 लाख रुपयांच्या नोटा उधळण्यात आलेल्या.