आज बॅंका संपावर, 'या' बॅंक असतील सुरू

सरकार या बॅंकांना अधीकच खड्ड्यात घालू पाहत आहे अशी भावना या संपकऱ्यांमध्ये आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 22, 2017, 09:34 AM IST
आज बॅंका संपावर, 'या' बॅंक असतील सुरू title=

मुंबई :  केंद्र सरकारने बॅंकींग क्षेत्रात आणलेल्या नव्या बदलांना विरोध करण्यासाठी देशभरातील बॅंका संपावर आज संपावर जाणार आहेत.  युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्स (यूएफबीयू) या बँक कर्मचारी संघटनेच्या मध्यवर्ती संघटनेने या संपाची हाक दिली आहे.

आर्थीक डबघाईला आलेल्या बॅंकांना अडचणीतून बाहेर काढण्याऐवजी सरकार या बॅंकांना अधीकच खड्ड्यात घालू पाहत आहे अशी भावना या संपकऱ्यांमध्ये आहे.

याचा परिणाम देशभरातील बॅंकिंग व्यवहारावर होणार आहे. मात्र असे असले तरीही खासगी बँकांसह अन्य बँका सुरू राहणार असल्याने ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे.

सरकार सुधारणांच्या नावाखाली बॅंकांचे खासगीकरण आणि एकत्रीकरण करू इच्छिते.

तसेच, बॅंक बोर्ड ब्यूरो (बीबीसी) च्या माध्यमातून सार्वजनीक क्षेत्रातील सर्व बॅंकांना एकाच बॅंकेच्या छताखाली आणून बॅंकींग गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून आणि सरकारी बॅंकांमधून सरकारची भागीदारी कमी करून ४९ टक्क्यांपेक्षाही कमी करण्यात आल्याचे यूएफबीयूतर्फे सांगण्यात आले.