देशातील तिसरी सर्वात मोठी बँक 1 एप्रिलपासून करणार काम

कसं असणार कामकाज 

देशातील तिसरी सर्वात मोठी बँक 1 एप्रिलपासून करणार काम  title=

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील तीन सर्वात मोठ्या बँकेच्या विलीनकरणाची घोषणा केली आहे. ही बँक व्यवहार करण्यासाठी 1 एप्रिलपासून सुरूवात करणार आहे. तसेच अर्थ वर्ष 2018-19 च्या अंतापर्यंत याच्याशी संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची आशा केली जात आहे. बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणातून सर्वात मोठी असून तिचा तिसरा क्रमांक असणार आहे. या तिन्ही बँका एकत्र केल्यामुळे याची क्षमता वाढणार असून ग्राहकांना आकर्षक स्कीम देखील दिल्या जाणार आहेत. 

सरकारने सोमवारी तीन सरकारी बँका - बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलिनीकरणाची घोषणा केली. या तिन्ही बँका एकत्र केल्यावर 14.82 लाख करोड रुपये एकत्र होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ही घोषणा केली. 

एसबीआय दुनियाच्या 50 मोठ्या बँकांमध्ये सहभागी 

गेल्यावर्षी सरकारने देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकमध्ये तिच्या पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँक विलीन केल्या. यानंतर स्टेट बँक जगातील 50 बँकेत सहभागी झाली. स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचं याआधीच विलीनीकरण करण्यात आलं होतं. स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ जयपूर अँड बिकानेर या स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण झालं होतं.