नवी दिल्ली : आज सर्वोच्च न्यायालयात पुणे पोलिसांची कसोटी लागणार आहे. एल्गार परिषदेत आणि त्य़ानंतर उसळलेल्या भीमा कोरेगाव मधील दंगलीत हात असल्याप्रकरणी स्थानबद्ध करण्यात आलेल्या पाच जणांविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात पोलिसांना पुरावे सादर करायचे आहेत.
पुरावे सबळ नसल्याचं लक्षात आल्यास एफआयआर रद्द करू, अशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयानं याआधीच्या सुनावणीत दिली आहे. त्यामुळे आज पुणे पोलीस नेमके काय पुरावे मांडतात यावर प्रकरणाचं भवितव्य ठरणार आहे.
महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन पाचही स्थानबद्ध आरोपींविरोधात पुरावे असल्याचं सांगितलं होतं.