Liz Truss यांच्या राजीनाम्यानंतर आनंद महिंद्रांना हसू आवरेना, ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करून मीम्स शेअर केलं आणि म्हटलं...

Updated: Oct 20, 2022, 11:40 PM IST
Liz Truss यांच्या राजीनाम्यानंतर आनंद महिंद्रांना हसू आवरेना, ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा! title=
anand mahindra tweet on liz truss resigns british humour never resigns

Anand Mahindra on Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधान (British Prime Minister) लिझ ट्रस (Liz Truss) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचा राजीनामा आणि संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यांकडून तीव्र टीका झाल्यानंतर ट्रस यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता लिझ ट्रस यांच्या नावाची एकच चर्चा होताना दिसत आहे. त्यावरून आता प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत टीका केली आहे.

"ब्रिटिश विनोदी रचनेचा कधीही राजीनामा होऊ शकत नाही", असं आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलंय. त्यांनी दोन फोटोही शेअर केले आहेत. याशिवाय आनंद महिंद्राने आणखी एक मीम शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी लिझ ट्रसबद्दल एक मीम शेअर केला होता.

आणखी वाचा - इंग्लंडमध्ये मोठा राजकीय भूकंप; Liz Truss यांचा राजीनामा, ऋषी सुनक होणार नवे पंतप्रधान?

टॅब्लॉइड डेली स्टारने ट्रसच्या चित्राशेजारी रेफ्रिजरेटेड आइसवर्ग ठेवलं होतं. भाजीपाला सडण्याआधीच ब्रिटनच्या पंतप्रधानांना नोकरी सोडली, असा मीम तयार करण्यात आला होता. ही पोस्ट शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी 'ग्रेट (क्रूर) ब्रिटन', असं म्हटलं आहे.

पाहा ट्विट - 

दरम्यान, महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ट्विटरवर (Twitter) अनेकदा ते प्रेरणादायी, मजेदार किंवा आश्चर्यकारक व्हिडिओ आणि फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत असतात. आता त्यांच्या या ट्विटमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.