खो खो विश्वचषक स्पर्धेत पेरू संघाचा 70-38 असा पराभव, भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित!

Kho Kho World Cup 2025:  खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 16, 2025, 08:17 AM IST
खो खो विश्वचषक स्पर्धेत पेरू संघाचा 70-38 असा पराभव, भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित!  title=
Photo Credit: Instagram

Peru vs India: खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने पेरू संघाचा 70-38 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले.  इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ब्लू जर्सी परिधान केलेल्या भारतीय पुरुष संघाने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत आपली विजयी मालिका कायम ठेवली. 

भारताने राखले वर्चस्व

सुरुवातीच्या टप्प्यात वर्चस्व गाजवल्यामुळे टीम इंडियासाठी जोरदार सुरुवात झाली. पेरूने टर्न 2 मध्ये थोडक्यात बचावात्मक भूमिका बजावली आणि भारतासाठी अडचणी निर्माण केल्या परंतु यजमानांनी कर्णधार आणि व्यवस्थापक प्रतीक वायकरच्या नेतृत्वाखाली आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले आणि पहिल्या फेरीत 36 गुण मिळवले.

 

सामन्यात भारताने उत्तम सुरुवात करत पेरू संघावर वर्चस्व गाजवले. कर्णधार प्रतीक वाईकर याने आपल्या नेतृत्वाखाली पहिल्या सत्रात भारतीय संघाला 36 गुणांची मजल गाठून दिली. दुसऱ्या सत्रात देखील आदित्य पोटे, सिवा रेड्डी आणि सचिन भार्गो यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने 70 गुणांची आघाडी प्राप्त केली. 

 

या विजयाबरोबरच भारतीय संघाने आपणच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले आहे. 

इतर पारितोषिके 

  • सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू: जिनर वर्घिस 
  • सर्वोत्कृष्ट बचावपटू: रामजी कश्यप
  • सामनावीर : अनिकेत पोटे.