अमूल दूधची उद्यापासून दरवाढ, जाणून घ्या किंमत

अमूलच्या कार्यकारी संचालकांनी दूध दरवाढीची घोषणा केली आहे.

Updated: May 20, 2019, 06:10 PM IST
अमूल दूधची उद्यापासून दरवाढ, जाणून घ्या किंमत  title=

नवी दिल्ली : अमूलच्या कार्यकारी संचालकांनी दूध दरवाढीची घोषणा केली आहे. अमूलने दूधाच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ केली आहे. मंगळवार म्हणजेच उद्यापासून (21 मे) ही दरवाढ लागू होणार आहे. अमूल टोंड मिल्क 500 मि.ली. पॅक आतापर्यंत 21 रुपयात मिळायचे त्यात एक रुपयांची वाढ होऊन 22 रुपयांना मिळेल. तर अमूलचे फूल 500 मि.ल क्रिम 28 रुपयांना मिळणार आहे. जे 27 रुपयांना मिळत होते. 

अमूल डेअरीने दूधाचे खरेदी मुल्य वाढवले आहे. अमूलने म्हशीच्या 1 लीटर दूधात 10 रुपयांनी वाढ केली होती. तर 1 लीटर दुधात 4.5 रुपयांनी वाढ केली होती. खरेदी मुल्यात ही वाढ केल्याने सात लाख पशु पालकांना याचा फायदा होणार आहे. पशु पालकांना वाढलेल्या किमतींचा फायदा 11 मे पासून मिळण्यास सुरुवात झाली होती. त्यांना म्हैशीच्या एक लीटरच्या दुधासाठी 640 रुपये गाईच्या दुधामागे प्रती लीटर 290 रुपये मिळू शकतील. 

गुजरातची कोऑपरेटीव्ह मिल्क मार्केटींग फेडरेशन (जीसीएमएमएफ) अमूलच्या नावे डेअरी उत्पादनाचा व्यवसाय करते.  फेडरेशनला सुरू आर्थिक वर्षात 2019-20 मधील व्यवसाय 20 टक्क्यांनी वाढून 40 हजार कोटी इतका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागच्या आर्थिक वर्षात जीसीएमएमएफने 13 टक्क्यांची वाढ करत 33 हजार 150 कोटींचा व्यवसाय केला होता.