चेन्नई : मक्कल निधी मय्यमचे नेते कमल हासन यांना मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 'नथुराम गोडसे'वरील वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर हासन यांच्यावर टीका होत होती. 'नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता.' असे वादग्रस्त वक्तव्य कमल हासन यांनी केले होते.
Madurai bench of Madras High Court grants anticipatory bail to Kamal Haasan in a case filed against him by Hindu Munnani party for his comments on Nathuram Godse.
— ANI (@ANI) May 20, 2019
चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारादरम्यान महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण करताना कमल हासन यांनी नथुराम गोडसे हिंदू दहशतवादी असल्याचे विधान केले होते. त्यानंतर ते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले. कमल हासन यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती.
न्या. बी. पुगालेंधी यांच्या खंडपीठाने कमल हासन यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे पुढील पंधरा दिवसात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कमल हासन यांना देण्यात आले आहेत.
सुट्टयांच्या कालावधीत अशा याचिकांचा स्वीकार करता येणार नसल्याचे न्या. बी. पुगालेंधी यांनी सांगितले. त्यामूळे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यास त्यांनी सूचवले होते.
कमल हासन यांच्यावर भादंवि कलम १५३(ए),२९५(ए) या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.