मद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघुशंका, Air India च्या विमानातला धक्कादायक प्रकार

एअर इंडिया विमानातल्या या धक्कादायक प्रकराने खळबळ, व्यवस्थापनाकडून समितीची स्थापना, आरोपी प्रवाशावर काय कारवाई होणार याची उत्सुकता

Updated: Jan 4, 2023, 02:43 PM IST
मद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघुशंका, Air India च्या विमानातला धक्कादायक प्रकार title=

Drunk man pees on woman in Air India: एअर इंडियाच्या (Air India) विमानात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये (Bussiness Class) नशेत असलेल्या एका प्रवाशाने चक्क दुसऱ्या सीटवर बसलेल्या महिलेच्या अंगावर लघुशंका केली. (drunk man urinated on woman) या घटनेने एक खळबळ उडाली. महिलेने तात्काळ याची माहिती विमानातल्या कर्मचाऱ्यांकडे केली. पण संतापजनक म्हणजे एअर इंडियातल्या कर्मचाऱ्यांनी (Cabin Crew) या प्रवाशावर कोणतीही कारवाई केली नाही. कारवाई न झाल्याने महिलेने थेट टाटा ग्रुपचे (Tata Group) चेअरमन एन चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून तक्रार केली. याची गंभर दखल घेत एअरइंडियाने प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 

काय आहे नेमकी घटना
26 नोव्हेंबरला घडलेल्या या घटने प्रकरणी एअर इंडियाकडून पोलिसांत तक्रार (Police Complaint) दाखल करण्यात आली आहे. एअर इंडिया व्यवस्थापन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. आक्षेपार्ह वर्तणूक करणाऱ्या प्रवाशाला नो फ्लाई लिस्टमध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण समीतीसमोर ठेवण्यात आलं असून लवकरच निर्णयाची शक्यता आहे. महिलेने पत्रात विमानातल्या कर्मचाऱ्यांविरोधातही संताप व्यक्त केला आहे. तक्रार केल्यानंतरही दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांवरही कारवाईची मागणी त्या महिलेने केली आहे. 

विमानात नेमकं काय घडलं?
26 नोव्हेंबरला एक महिला प्रवासी न्यूयॉर्कवरुन दिल्लीला (New York To Delhi Flight) जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होती. ती बिझनेक क्लासमध्ये बसली आहे. फ्लाईट AI-102 हे विमान दुपारी एक वाजता न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावरुन रवाना झालं. काही वेळ वातावरण शांत होतं. पण विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच नशेत असलेला एक प्रवाशी एका महिलेच्या सीटजवळ गेला आणि पँटची झीप उघडून त्याने महिलेवर लघुशंका केली.

अचानक घडलेल्या या घटनेने विमानात खळबळ उडाली. बाजूला बसलेल्या इतर प्रवाशांनी याबाबत विचारला असता तो व्यक्ती तिथून निघून गेला. तो प्रवासी निघून गेल्यानंतर महिलाने विमानातील कर्मचाऱ्यांकडे या घटनेची तक्रार केली. महिलेचे कपडे आणि सामान खराब झालं, यानंतर तीने विमानातला वॉशरुमध्ये जाऊन कपडे बदलले.

विमानातल्या कर्मचाऱ्यांकडून त्या महिलेला कपडे आणि चप्पल देण्यात आली. त्यानंतरही महिलेला तिच्या जागेवर बसता आलं नाही, कारण दुर्गंधी पसरली होती. त्यानंतर कीटकनाशक आणि परफ्युम मारल्यानंतर दुर्गंधी कमी झाली. पण त्या महिलेला बसण्यासाठी दुसरी जागा देण्यात आली. आता त्या आरोपी प्रवाशावर एअर इंडिया प्रशासन कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागलं आहे.