Aadhaar सोबत UAN नंबर जोडला नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

तुमच्या PF खात्याला आधार लिंक आहे का? नाहीतर होऊ शकतं आर्थिक नुकसान, वाचा कसं ते 

Updated: Sep 5, 2021, 09:51 PM IST
Aadhaar सोबत UAN नंबर जोडला नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं title=

मुंबई: आता आधार कार्ड बँक खात्यापासून ते मोबाईलपर्यंत प्रत्येक गोष्टीला लिंक करणं बंधनकारक झालं आहे. पण तुम्ही जर कर्मचारी वर्गात येत असाल आणि तुमच्या PF खात्याला अजूनही जर आधार कार्ड लिंक केलं नसेल तर आजच करून घ्या नाहीतर खूप मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.  जर तुम्ही अजून तुमचे EPF खाते आधारशी लिंक केले नसेल तर ते तातडीनं करणं गरजेचं आहे. नाहीतर कंपनी EPF खात्यात महिन्याचा PF जमा होणार नाही. त्याच वेळी, आवश्यक असल्यास आपण पीएफचे पैसे काढू शकणार नाही. 

ईपीएफ ग्राहकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आधारशी जोडणे आवश्यक आहे. UAN सह आधार नंबर घरबसल्या तुम्हाला लिंक करता येऊ शकतो. यासाठी तुम्ही वेबसाईटवर जाऊन करून शकता. दुसरी पद्धत म्हणजे उमंग अॅपद्वारे तिसरी पद्धत म्हणजे EPFO च्या KYC पोर्टलद्वारे आणि चौथी पद्धत EPFOच्या पोर्टलवरील बायोमेट्रिक प्रमाणपत्राद्वारे आधार कार्ड लिंक करता येऊ शकते. 

यासाठी EPFO Member e-SEWA पोर्टलवर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/ या वेबसाईटवर जावं लागणार आहे. तिथे तुम्हाला UAN नंबर आणि पासवर्ड अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर मॅनेज टॅबवर जा आणि KYC वर क्लिक करा. तिथे एक नवीन पेज सुरू होईल. तिथे KYC अॅड करा आणि तुमचा आधार आणि पॅन नंबर अपलोड करा.

Pending KYC Tab मध्ये तुम्हाला केवायसी तुमचे पेंडिंग असल्याचं दिसेल. तिथे EPFO कडून लिंक अप्रूवल येईल त्यानंतर Approved KYC टॅब तुम्हाला दिसेल आणि तुमचं आधार पॅन तुमच्या EPF खात्याला लिंक झालेलं दिसेल. आधार-UAN लिंक केलं की नाही हे जर तुम्हाला आठवत नसेल तर काय करायचं. ते देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे तपासण्याचा एक सोपा मार्ग आहे. EPFO च्या पोर्टलवर जा. तिथे unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर क्लिक करा. तिथे UAN आणि पासवर्ड टाकून तुमच्या खात्यात लॉग इन करा. 

त्यानंतर मॅनेज टॅब अंतर्गत दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.  वेरिफाइड डॉक्यूमेंट्समध्ये तुम्हाला तुमचं UAN आणि आधार जोडलं आहे की नाही ते दाखवलं जाईल. जर तुमचा आधार क्रमांक अप्रूव्ड म्हणून दाखवत असेल तर तुम्हाला UAN ला आधारशी लिंक करण्याची गरज नाही. ईपीएफओच्या नियमांनुसार, प्रत्येक खातेदाराचे पीएफ खाते 31 ऑगस्ट 2021 पर्यंत आधारशी जोडलेले असावे असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजच हे काम करायला विसरू नका.