नवी दिल्ली : चित्रपट अभिनेत्री लीना मारिया पॉलला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या EOW ने तिला अटक केली आहे. लीना पॉल (Leena Maria Paul) सुकेश चंदशेखरची पत्नी आहे. 200 कोटींच्या खंडणीच्या प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात सुकेश सोबत त्याची पत्नी आणि चित्रपट अभिनेत्री लीना पॉल होती.
एआयएडीएमकेचे निवडणूक चिन्ह मिळवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुकेश चंद्रशेखरने रेलिगेअर कंपनीचे प्रवर्तक मालविंदर आणि शिविंदर सिंग यांच्या पत्नींना तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर काढताना कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे तपासात उघड झाले आहे.
शिविंदर सिंगची पत्नी अदितीनंतर, मालविंदरची पत्नी जापना सिंगनेही आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली, ज्यात तिने सांगितले की तिच्या पतीला जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली तिच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. तक्रारीमध्ये जपना सिंग यांनी म्हटले आहे की, फोन करणारा एक वरिष्ठ सरकारी अधिकारी आहे आणि त्याने मालविंदर सिंगला जामिनावर तुरुंगातून बाहेर येण्यास मदत करण्याची ऑफर दिली आहे. त्या बदल्यात हाँगकाँगमधील एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले होते.
फोन करणाऱ्याने हे पैसे काही पार्टी फंडात देण्याचे सांगितले आणि त्या बदल्यात तिच्या पतीला जामिनावर तुरुंगातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जापना सिंग यांनी त्या बँक खात्यात 3.5 कोटी रुपये जमा केले होते. याआधीही सुकेश चंद्रशेखरने मालविंदरचा भाऊ शिविंदरच्या पत्नीला असाच फोन केला होता आणि जामीन मिळवण्याच्या नावाखाली 200 कोटी रुपये गोळा केले होते.
सिंग बंधूंच्या पत्नींच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत. जापनाच्या तक्रारीवर दाखल केलेल्या एफआयआरनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी तिला हाँगकाँगस्थित कंपनीला पैसे देण्यास सांगितले. ते म्हणाले की हे खाते सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे. रेलिगेअरचे प्रमोटर सिंग बंधू ऑक्टोबर 2019 पासून तिहार जेलमध्ये आहेत. या दोघांवर रेलीगेअर फिनवेस्ट आणि त्याची मूळ कंपनी रेलिगेअर एंटरप्राइजमध्ये 2397 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.