अयोध्येतील 'त्या' वादग्रस्त जागेवरुन हेलिकॉप्टरचे उड्डाण

अयोध्येतील त्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारलं जावं की बाबरी मशीद हा वाद सुरु असतानाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 11, 2017, 05:21 PM IST
अयोध्येतील 'त्या' वादग्रस्त जागेवरुन हेलिकॉप्टरचे उड्डाण  title=
Representative Image

अयोध्या : अयोध्येतील त्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारलं जावं की बाबरी मशीद हा वाद सुरु असतानाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

अयोध्येतील त्या वादग्रस्त जागेपासून ठराविक उंचीवर एका हेलिकॉप्टरने उड्डाण केल्याची माहिती समोर आली आहे. खुपच कमी उंचीवरुन या हेलिकॉप्टने उड्डाण केल्याने पोलिसही सतर्क झाले आहेत. 

त्या वादग्रस्त जागेचे सुरक्षा प्रभारी पोलीस अधिक्षक महेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, आम्ही त्या हेलिकॉप्टर संदर्भात माहिती मिळविण्यासाठी विमानन मंत्रालयासोबत संपर्क करत आहोत. 

महेंद्र सिंह चौहान यांनी पूढे सांगितले की, ही वादग्रस्त जागेवरुन उड्डाण करण्यास बंदी नाहीये. स्थानिक प्रशासनाने उड्डाण करण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र, अद्याप सरकारने याला परवानगी दिलेली नाहीये.  या वादग्रस्त जागेपासून जवळ राहणारे अनूप कुमार यांनी सांगितलं की, सकाळी आठ वाजून ४० मिनिटांनी एका हेलिकॉप्टरने वादग्रस्त जागेवरुन उड्डाण केले. 

५ डिसेंबरपासून सुनावणी

या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधावे की बाबरी मशीद यावर गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. अलाहाबाद हायकोर्टाने २०१० मध्ये दिलेल्या निर्णयानंतर गेल्या ७ वर्षांपासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात या वादावर सात वर्षांनंतर आता सुनावणी सुरु केली आहे. पुढील सुनावणीसाठी ५ डिसेंबरची तारीख देण्यात आली आहे.