लग्नाच्या मंडपात घडली भयानक घटना; एका क्षणातं होत्याचं नव्हत झालं

बघता बघता संपूर्ण मंडप पेटला. आगीमुळे नवरदेवाचे घराचे छतही पेटले. अनेक जण आगीत अडकले. स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अखेरीस अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. 

Updated: Dec 8, 2022, 11:52 PM IST
लग्नाच्या मंडपात घडली भयानक घटना; एका क्षणातं होत्याचं नव्हत झालं title=

Shocking News : लग्न सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण. लग्नाच्या मंडपात भयानक घटना घडली आणि एका क्षणातं होत्याचं नव्हत झालं. राजस्थानमधील(Rajasthan) जोधपूरमध्ये ही घटना घडली आहे. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने 51 जण जखमी झाले आहेत. त्याचवेळी या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  भुंगरा येथील रहिवासी सगतसिंग गोगादेव यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यावेळी ही भयानक दुर्घटना घडली.  यावेळी लग्नामंडपात जेवणाची तयारी सुरु असतानाच अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे मंडपात भीषण आग लागली. मंडपात पळापळ झाली.

बघता बघता संपूर्ण मंडप पेटला. आगीमुळे नवरदेवाचे घराचे छतही पेटले. अनेक जण आगीत अडकले. स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अखेरीस अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. 

 लग्न सोहळ्यात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या आगीत 51 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. यात नवरदेवाच्या वडिलांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.