Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. कधी डान्स करणारे तर कधी उपदेश देणारे, मनोरंजन करणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यामधील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ आठवणींच्या जगात नेतात. पण यातील काही व्हिडीओ मात्र आपल्या भुवया उंचवतात. म्हणजे तर त्या घटना कॅमेऱ्यात कैद झाल्या नसत्या तर कोणाचा विश्वासच बसला नसता. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे. येथे एका चिमुरड्याच्या अंगावरुन गाडी जाऊनही तो सुखरुप आहे. आता हे कसं काय शक्य असं तुम्हालाही वाटत असेल ना....पण हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे कार अंगावरुन जाऊनही चिमुरडा उठून धावत सुटतो.
ऊन सहन होईना म्हणून लेकरु पार्किंगमध्ये जाऊन झोपलं, गाढ झोपेत असतानाच SUV आली अन् पुढच्या क्षणी....
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यानुसार, चिमुरडा रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचं दिसत आहे. चिमुरडा जात असतानाच विरुद्द दिशेने एक कार येते आणि चिमुरड्याला धडक देते. यानंतर कार त्याच्या अंगावरुन जाते. सीसीटीव्हीत कारची चाकं तिच्या अंगावरुन जात असल्याचं दिसत आहे. पण यानंतरही चिमुरड्याला काही होत नाही आणि ते उठून रडत रस्त्यावरुन धावत सुटतं.
विशेष म्हणजे रस्त्यावरुन जाणाऱ्यांनाही चिमुरडीच्या अंगावरुन गाडी गेल्याचं कळत नाही. बाजूने जाणारी दुचाकी किंवा इतर कोणीही चिमुरडीकडे पाहत नाही. दरम्यान, चिमुरडीला धडक दिल्यानतंर कारचालकही थांबत नाही आणि तो सुसाट निघून जातो.
जाको राखे सइयां मार सके न कोय
वायरल वीडियो गोरखपुर की है.@gorakhpurpolice@Uppolice pic.twitter.com/RnvvjM6k20— rajni singh (@imrajni_singh) May 28, 2023
दरम्यान हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. हे कसं काय शक्य आहे अशी विचारणा अनेकजण करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हैदराबादमध्ये (Hyderabad) ऊन सहन होत नसल्याने एका इमारतीच्या पार्किंगमध्ये झोपणं चिमुरडीच्या जीवावर बेतलं. पार्किंगमध्ये झोपलेली असताना SUV अंगावरुन गेल्याने तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.
#Hyderabad: In a tragedy incident reported in Hayat Nagar RTC Colony, a 2 year old died after a car ran over it.
The mother works at a construction site and left the baby Lakshmi,in a nearby parking area. Unfortunately, a car ran over the baby, resulting in the child's death. pic.twitter.com/kq4eJ2mVie
— NewsMeter (@NewsMeter_In) May 24, 2023
बाहेर असह्य ऊन असल्याने एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये झोपली होती. यादरम्यान, इमारतीत पार्किंगसाठी आलेली एसयुव्ही अंगावरुन गेल्याने चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. ही सर्व घटना इमारतीच्या सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे.