तीन मुलांच्या आईने अंधाराचा फायदा घेत दीरासोबत....; सकाळी उठून पाहिल्यावर कुटुंब हादरलं

UP Crime : अनैतिक संबंधांमुळे सहा मुलांच्या डोक्यावरुन आई वडिलांचे छत्र हरवलं आहे. पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. मात्र तरीही काही फायदा झाला नाही. पोलिसांनीही महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने कुणाचेही ऐकले नाही आणि आपल्या मनासारखे पाऊत उचललं.

आकाश नेटके | Updated: May 28, 2023, 05:46 PM IST
तीन मुलांच्या आईने अंधाराचा फायदा घेत दीरासोबत....; सकाळी उठून पाहिल्यावर कुटुंब हादरलं title=
(फोटो सौजन्य - pexels.com)

UP Crime : अनैतिक संबंधांच्या (Immoral relationship) अनेक घटना रोज उघडकीस येत असतात. याच अनैतिक संबंधातून अनेकदा गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक सुखी कुटुंबे देखील तुटली आहेत. मात्र प्रेमात बुडालेल्या जोडप्यांना इतर कोणाचाही विचार येत नाही आणि ते टोकाचं पाऊल उचलतात. उत्तर प्रदेशात (UP Crime) असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन मुलांच्या आईचा स्वतःच्याच दीरावर जीव जडला होता. त्यानंतर दोघांनाही एकदा अंधाराचा फायदा घेत असा काही प्रकार केला की सगळ्या कुटुंबालाच धक्का बसलाय.

उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रामपूरमध्ये एका विवाहित महिलेने अंधाराचा फायदा घेत असे काही केले की, संपूर्ण गावात आता त्याची चर्चा सुरु आहे. तीन मुलांची आई दीराच्या प्रेमात पडली. दीरसुद्धा भावाच्या पत्नीवर प्रेम करू लागला. त्याला सुद्धा तीन अपत्ये होती. मात्र दोघेही प्रेमात इतके बुडाले होते की आपण काय करतोय याचं भान त्यांना नव्हतं. दोघांमधल्या प्रेमाचा महिलेच्या नवऱ्यालाही किंचितसुद्धा सुगावा लागला नाही.

बराच काळ चोरुन प्रेम केल्यानंतर त्यांनी कायमचं एकत्र यायचं ठरवलं. महिलेला कायमचं तिच्या दीराचे व्हायचं होतं. त्यामुळे तिने दीरासोबत पळून जाण्याचा बेत आखला आणि एका रात्री अंधाराचा फायदा दोघेही पळून गेले. सकाळी घरातील सगळ्यांनी उठून पाहिले तेव्हा त्यांना काहीच समजले नाही. मात्र हळूहळू सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.

त्यानंतर 10 दिवसांनी दोघेही थेट पोलीस ठाण्यात अवतरले. याची माहिती मिळताच महिलेचे कुटंबिय आणि यांनीही पोलीस ठाणे गाठले आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि तिने दीरासोबतच राहण्याचा आपला निर्णय असल्याचे सर्वांना सांगून टाकले. अनेक तास दोघांना समजवण्याचा प्रयत्न झाला पण त्यांनी काय ऐकली नाही. शेवटी महिलेने आपला हट्ट पूर्ण केला आणि दीरासोबत निघून गेली.

 या महिलेला तीन मुले आहेत आणि तिच्या दीरालाही तीन मुले आहेत. दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोघेही दहा दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात कोणाला न सांगता घरातून पळून गेले. महिलेचा पती व भावजय यांच्या नातेवाईकांनी दोघांचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते कुठेच सापडले नाहीत. त्यानंतर अचानक ते पोलीस ठाण्यात हजर झाले. तेव्हा महिलेचा पती, मुले व भावजयीसह नातेवाईकही पोलीस ठाण्यात आले. महिलेच्या पतीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण भावाच्या प्रेमात ती वेडी झाली आपल्या तीन मुलांनाही सोडायला तयार होती.

दुसरीकडे, दीरही महिलेला सोबत घेऊन जाण्यात तयार झाला. पोलिसांनीही महिलेला समजण्याचा प्रयत्न केला, मात्र ती महिला तिच्या निर्णयावर ठाम राहिली. संध्याकाळी उशिरा महिलेचे कुणाचेही न ऐकल्याने पोलिसांनी तिच्या स्वत:च्या इच्छेनुसार तिला दीरासोबत पाठवून दिले.