Crime News : बलात्कार करता आला नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीला...12 वर्षाच्या मुलाचे हैवानी कृत्य पाहून पोलिसही हादरले

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात ही अंगावर काटा आणणारी आणि भितीने थरकाप उडवणारी घटना घडली आहे. आरोपी मुलाचे वय अवघं बारा वर्षे आहे. त्याने पाच वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे. आरोपी मुलाला मुलीच्या मृतदेहासोबत पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Updated: Jan 23, 2023, 12:10 AM IST
Crime News : बलात्कार करता आला नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीला...12 वर्षाच्या मुलाचे हैवानी कृत्य पाहून पोलिसही हादरले title=

Uttar Pradesh Crime News : अवघ्या बारा वर्षाच्या मुलाने असे हैवानी कृत्य केले की पोलिसही हादरले आहेत.  बलात्कार करता आला नाही म्हणून या मुलाने पाच वर्षाच्या मुलीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली आहे. उत्तर प्रदेशात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. या मुलाने पोलिसांना गुन्ह्याची कबूली दिली असल्याचे समजते (Uttar Pradesh Crime News).

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात ही अंगावर काटा आणणारी आणि भितीने थरकाप उडवणारी घटना घडली आहे. आरोपी मुलाचे वय अवघं बारा वर्षे आहे. त्याने पाच वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे. आरोपी मुलाला मुलीच्या मृतदेहासोबत पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

काय आहे नेमकी घटना?

गाझियाबादचे डीसीपी रवी कुमार यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे.  पोलिसांच्या चौकशीत आरोपी मुलाने गुन्हा केल्याचे मान्य केले आहे. या 12 वर्षाच्या मुलाने पाच वर्षाच्या मुलीची हत्या आणि बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. मात्र,  चौकशीत मुलाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.

आरोपी बारा वर्षाच्या मुलीने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने त्याच्या कृत्याला विरोध केला. यामुळे हा मुलगा चिडला. रागाच्या भरात त्याने एक वीट उचलून या मुलीच्या डोक्यात घातली. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

स्थानिकांनी आरोपी मुलाला मुलीच्या मृतदेहाजवळ पाहिले. लोकांनी विचारपूस करायला सुरुवात केल्यावर मुलाने घटनास्थळावरु पळ काढला आणि घरी जाऊन शर्ट बदलला. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस थेट या मुलाच्या घरी पोहचले. त्यांनी त्याची चौकशी केली. आपला या घटनेशी काही संबध नाही असं म्हणत या मुलाने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तर देण्यास टाळाटाळ केली. मात्र, ती मुलगी जिवंत आहे तिने आम्हाला सर्व सांगितले आहे असं म्हणत भिती दाखवली. यानंतर मुलाने गुन्ह्याची कबूली दिली.