7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 1 मार्चलाच दिवाळी; पाहा कोणाला कितपत फायदा होणार

7th Pay Commission Latest News : इथे अनेक कंपन्यांमध्ये सध्या Appraisals प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर, काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ लागू केली आहे. सरकारी खातं इथं बरंच पुढे गेलं आहे.... 

Updated: Feb 28, 2023, 04:07 PM IST
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 1 मार्चलाच दिवाळी; पाहा कोणाला कितपत फायदा होणार  title=
7th Pay Commission Latest Update Employess will get da salary hike

7th Pay Commission: तुम्ही (Job News) नोकरी करता का? काय मग यंदा किती टक्क्यानं पगारवाढीची अपेक्षा आहे? बऱ्याच संस्थांनी केलेल्या अहवालानुसार यंदाच्या वर्षी कर्मचाऱ्यांना दोन आकडी टक्क्यांमध्ये Appraisals मिळणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. तिथं अनेक खासगी कंपन्यांमध्ये सध्याच्या घडीला पगारवाढीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आपण वर्षभरात नेमकं काय काम केलं आणि त्यासाठी आपल्याला चांगल्यातली चांगली पगारवाढ (Salary Hike) कशी मिळावी, यासाठीच कर्मचारी प्रयत्नशील आहेत. 

सरकारी कर्मचारी (Government Jobs) यात बरेच पुढे गेले आहेत असं म्हणावं लागेल. कारण पगारवाढीच्या शर्यतीत त्यांची पुन्हा एकदा चांदी झाली आहे. 1 मार्च 2023 हा दिवस केंद्राच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी (Central government employees) अधिक खास आहे. कारण त्यांची महागाई भत्त्याची (DA Hike) प्रतीक्षा आता संपणार आहे. थोडक्यात अखेर केंद्र शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवर शिक्कामोर्तब गोणार आहे. ज्यामुळं जुनं आर्थिक वर्ष (Financial News) संपवून नव्या आर्थिक वर्षात जाताना या मंडळींचा पगार तब्बल 27312 रुपयांनी वाढणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Salary Hike : दणक्यात होणार पगारवाढ; यंदा नोकरदार वर्गाला मिळणार दोन आकडी Appraisals 

पगारवाढीमुळं कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणारा (Monthly Salary) मासिक वेतनाचा आकडाही तितकाच मोठा असणार आहे. शिवाय जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांतील पैसेही कर्मचाऱ्यांना एरियर्सच्या स्वरुपात मिळणार आहेत. इथं आकडेमोड करायची झाल्यास 4 टक्के पगारवाढीमुळं महिन्याला 720 ते 2276 रुपयांनी वाढू शकतो. 

मूळ वेतनापेक्षा भत्त्यांनीच वाढतोय पगार... (Basic Salary Hike)

1 मार्चला होणाऱ्या बैठकीमध्ये पगारवाढीला मान्यता मिळेल अशी दाट शक्यता आहे. ज्यामुळं 4 टक्क्यांनी पगारवाढ होणं अपेक्षित आहे. असं झाल्यास सध्या मिळणाऱ्या 38 टक्क्यांच्या DA मध्ये नव्यानं वाढ होऊन हा आकडा 42 टक्क्यांवर पोहोचेल. 

मूळ वेतन आणि पगारवाढीचा आकडा पाहता ज्यांचं दरमहा मासिक वेतन 18000 रुपये असल्यास महिन्याला पगार 720 रुपयांनी वाढेल म्हणजेच वर्षाला ही वाढ 8640 रुपये इतकी असेल. ज्या कर्मचाऱ्यांचं मासिक मूळ वेतन 56900 रुपये आहे त्यांचा पगार महिन्याला 2276 रुपयांनी वाढून एकूण वाढीचा आकडा 27312 रुपयांवर पोहोचेल. त्यामुळं मार्च महिन्यातच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आहे असं म्हणायला हरकत नाही.