Wedding Viral Video : सोशल मीडियावर क्षणा क्षणाला व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर दोन आजोबांचे व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रेमाला न वयाची ना रंग, जातीची मर्यादा असते. कोणत्याही वयात प्रेम होऊ शकतं. प्रेम ही अशी भावना ही प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक आजोबा नातीच्या वयाच्या तरुणीशी लग्न करताना दिसत आहे. तर दुसरे आजोबात तरुणीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्यामुळे तरुणांनी हा व्हिडीओ पाहून त्यांच्यावर टीका केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @butterfly__mahi या हँडल आजोबांचा हा लग्नाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यानतंर या व्हिडीओ आतापर्यंत 2 मिलियन एवढं व्ह्यूज आले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने म्हटलंय की, 'काका निवृत्तीच्या वयात लग्न करत आहेत.' आणखी एका युजरने लिहिलंय की, 'आमच्या सारख्या सिंगल लोकांमध्ये काय उणीव आहे.' तर तिसरा यूजर्स म्हणतो की, 'या प्रेमाला काय नाव देऊ...'
सोशल मीडियावरील दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक आजोबा नातीच्या वयाच्या तरुणीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ @dharambrisback शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमधील आजोबा सोशल मीडियाव खूप प्रसिद्ध आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्याचा धक्का बसेल की, या आजोबांचे 10 पेक्षा जास्त गर्लफ्रेंड आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर अनेक रोमँटिक व्हिडीओ तुम्हाला पाहिला मिळेल. त्याचे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून नुकताच झालेल्या व्हायरल व्हिडीओला 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडीओनंतही सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेक यूजर्सने या व्हिडीओवर संतापजनक कंमेंट्स दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, "ताऊचा खरा चेहरा अद्याप न दिसल्याने मी दु:खी आहे." आणखी एका यूजर म्हणतो की, "अरे दादा, तुम्ही नाही, तुमचा हा व्हिडीओ पाहून आम्ही मरणार आहोत." तर दुसरा यूजर म्हणतो, "तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता?"