Post Office Scheme: सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. विशेष म्हणजे सरकारी योजनेत कोणतीही रिस्क नसते. सरकार महिलांसाठीही अनेक योजना आणत आहे. कमी गुंतवणुकीतही चांगला व्याज या योजनेतून मिळतोय. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुम्ही या योजनेअंतर्गंत खाते सुरू करु शकता. या योजनेत कोण गुंतवणूक करु शकतं आणि कशी गुंतवणूक करता येऊ शकते, याची माहिती जाणून घेऊया. (Mahila Samman Saving Certificate Scheme In Marathi)
सरकारने महिलांसाठी स्मॉल सेव्हिंग स्कीमअंतर्गंत एक योजना सुरू केली आहे. यात महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट (Mahila Samman Saving Certificate Scheme) या नावाने ओळखले जाते. ही योजना गुंतवणुकीवर चांगला व्याज परतावा मिळतो. त्यामुळं या योजनेत गुंतवणूक करुन महिलांना फायदा होणार आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गंत 7.5 टक्के व्याज मिळतेय. या स्मॉल सेव्हिंग योजनेंत फक्त दोन वर्षे गुंतवणूक करावी लागते. त्याचबरोबर या योजनेत जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतची रक्कम गुंतवू शकता. केंद्र सरकारने महिला सन्मान बचतपत्र योजना 2023मध्ये सुरू केली होती. चांगला परतावा मिळत असल्याने कमी वेळातच या योजनेचा पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनांमध्ये समावेश झाला.
केंद्र सरकारने या योजनेची सुरवात महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू करण्यात आली होती. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर, यात TDSमध्येही सूट मिळते. CBDT नुसार, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत, या योजनेवर TDS तेव्हाच लागू होईल जेव्हा आर्थिक वर्षात व्याज उत्पन्न 40 ते 50 हजार रुपये असेल. या योजनेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठीही खाते उघडता येते.
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत मिळणाऱ्या व्याजाचे कॅलक्युलेशन केल्यास या योजनेअंतर्गंत दोन वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास 7.5 टक्क्यापर्यंत व्याज मिळतेय. तसंच, जर एखादी महिला 2 लाखापर्यंत गुंतवणूक करते तर दोन वर्षांच्या कालावधीत एकूण परतावा 31,125 रुपये इतका असणार आहे. या योजनेचा भाग होण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या माध्यमातून सुरू करता येऊ शकते. खाते सुरू करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि केवायसी व एक चेक द्यावा लागणार आहे.