नवी दिल्ली : आगामी प्रजासत्ताक दिनी आसियान देशांच्या सर्व प्रमुखांना आमंत्रित करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीये. आपल्या मन की बात या रेडिओ वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
प्रजासत्ताकदिनी एखाद्या परदेशी राष्ट्रप्रमुखाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्याची प्रथा जुनी असली तरी यंदा प्रथमच तब्बल १० प्रमुख पाहुणे या सोहळ्याला हजर राहण्याची शक्यता आहे.
दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना किंवा आसियान या गटात इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, म्यानमार, व्हिएतनाम, फिलिपिन्स, ब्रुनेई, कंबोडिया आणि लाओस हे १० देश आहेत.
या देशांच्या नेत्यांना २६ जानेवारीला निमंत्रित करण्यात येणार असल्याचं मन की बातमध्ये पंतप्रधानांनी सांगितलंय.
याखेरीज तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला लोकसभेमध्ये मंजुरी मिळाल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलंय.