डायटिंग जमत नसल्यास या ७ सोप्या टिप्सने कमी करा वजन!

वाढलेले वजन आणि सुटलेले पोट ही आजकाल अनेकांची समस्या आहे.

Updated: May 17, 2018, 12:14 PM IST
डायटिंग जमत नसल्यास या ७ सोप्या टिप्सने कमी करा वजन! title=

मुंबई : वाढलेले वजन आणि सुटलेले पोट ही आजकाल अनेकांची समस्या आहे. मग ते कमी करण्यासाठी जीम किंवा डायटिंगचा सहारा घेतला जातो. पण अनेकांना डायटिंग करणे जमत नाही किंवा शक्य होत नाही. तर जीमला जाण्यासाठी वेळ नसतो. अशावेळी वाढलेले वजन कमी कसे करावे? तर अगदी सोपे उपाय आहेत, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. तुम्हीही ट्राय करा या सोप्या टिप्स...

#1. अन्न शक्य तितके चावून खा. अधिक चावल्याने अन्न लवकर पचते आणि वजन कमी होण्यास मदत होते. घाईघाईत जेवणे टाळा.

#2. एका संशोधनानुसार, लोक जितके झोपतात तितके वजन कमी होते. प्रत्येक रात्री एक तास अधिक झोपल्याने एका वर्षात सुमारे १४ पाऊंड वजन कमी होण्यास मदत होते. मात्र खाल्यानंतर लगेचच झोपण्याची सवय सोडा.

#3. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर असते. त्यामुळे त्याचे सेवन लाभदायी ठरेल.

#4. वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे टाळू नका. नियमित नाश्ता करा. एकाच वेळी खूप खाण्यापेक्षा काही वेळाच्या अंतराने थोडे थोडे खा. रात्री हलके जेवण घ्या.

#5. तुम्हाच्या आवडीचे ड्रेस टाईट होत असतील तर ते नेहमी डोळ्यांसमोर ठेवा. त्यातून तुम्हाला वजन कमी करण्याची प्रेरणा मिळेल.

#6. जीमला जात नसाल तर नियमित योगसाधना करा. नियमित योगा केल्याने नक्कीच फायदा होईल.

#7. बाहेरचे खाणे टाळा. घरी बनवलेले अन्न खा. जेवण अधिक शिजवू नका. त्यामुळे त्यातील पोषकघटक कमी होतील. परिणामी भूक भागत नाही आणि अधिक खाले जाते.