कानात नेमका मळ का येतो? तो घातक की कामाचा? साफ करण्याची 'ही' योग्य पद्धत...

कान साफ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

Updated: Aug 6, 2021, 03:06 PM IST
कानात नेमका मळ का येतो? तो घातक की कामाचा? साफ करण्याची 'ही' योग्य पद्धत... title=

मुंबई : तुमच्या कानातील मळ तुम्ही कसा काढता? यावर अनेकांचं उत्तर हे इअरबड्स असं असेल. मात्र कान साफ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? अनेकांच्या मताप्रमाणे, कान हा आपोआप साफ होतो त्याला साफ करण्याची गरज भासत नाही. तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे, कान साफ करण्यासाठी काही विशिष्ठ पद्धतींचा वापर करावा लागतो. 

ब्रिटीश ईएनटी सर्जन गैब्रियल वेस्टन यांनी माहिती दिली की, कानातील मळ हा हे कानाच्या आत असलेल्या ग्रंथींमध्ये तयार होते आणि त्याची अनेक कार्ये असतात. 

कानातील मळाचं कार्य

  • हे आपला कान स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतं
  • हे कानाच्या नलिकांवरील थर कोरडा पडण्यापासून प्रतिबंध करतो
  • कानातील मळ हा धूळीकण आणि पाण्यापासून संरक्षण करतं. ज्यामुळे संक्रमण होण्याचा धोका असतो.
  • बहुतांश वेळा आपली कान त्याची सफाई स्वतःच करतो
  • कानाचा मळ कधी समस्या ठरू शकतो

इयरवॅक्स किंवा कानाचा मळ हा सामान्यपणे समस्या ठरत नाही. मात्र जर कानामध्ये मळ अधिक प्रमाणात बनत असेल तर ती समस्या ठरू शकते. यामुळे कानात वेदना होण्याची किंवा ऐकू कमी येण्याची तक्रार उद्भवू शकते. दरम्यान बाजारात अशा काही गोष्टी उपलब्ध आहेत ज्यांच्या माध्यमातून कानाची सफाई केली जाऊ शकते. मात्र प्रश्न असा आहे की, या गोष्टींच्या वापराने खरंच मदत मिळते का?

कॉटन बड्स

ज्यावेळी कॉटन बड्सचा वापर करतो त्यावेळी आपण ईअरवॅक्सला कानाच्या आतल्या बाजूला ढकलतो. हे कानाच्या त्या भागाला जाऊन चिटकतं जे भाग स्वतःची सफाई करू शकत नाही. इअरवॅक्समध्ये कानाच्या बाहेरील बॅक्टेरिया असू शकतात ज्यामुळे संक्रमण होऊ शकतं. 

ईअर कँडल

कानातील मळ काढण्यासाठी बाजारात ईअर कँडल देखील बाजारात उपलब्ध आहेत. असा दावा करण्यात येतो की याच्या वापराने कानातील मळ साफ होण्यास मदत होते. मात्र अनेक संशोधनांनुसार असं समोर आलंय की, कानातील मळ साफ करण्यासाठी इयर कँडल पुरेशी प्रभावी नाही. मुख्य म्हणजे यामुळे कान आणि चेहरा भाजण्याची शक्यता असते. शिवाय मेण कानात जाऊन कानाच्या पडद्याचं नुकसना करू शकतो.

ईयर ड्रॉप्स

बाजारात कानातील मळ साफ करण्यासाठी अनेक इअरड्रॉप्स उपलब्ध आहेत. ज्यांच्यामध्ये पेरॉक्साइड, सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम क्लोराइड असतं. हे इअर ड्रॉप्स कानासाठी प्रभावी असू शकतात. मात्र यामुळे त्वचेला हानि पोहोचण्याची शक्यता असते.

पाण्याने सफाई

जर तुम्हाला इअरवॅक्सचा सतत त्रास होत असेल तर डॉक्टर तुम्हाला कान पाण्याने स्वच्छ करण्याचा सल्ला देतील. वैद्यकीय शास्त्रात या पद्धतीला सिरिंजिंग असेही म्हणतात. या तंत्रात इअरवॅक्स साफ करण्यासाठी सिरिंजद्वारे कानाच्या नलिकांवर पाण्याचे फवारे टाकले जातात. यामध्ये कान साफ होतो मात्र हे त्रासदायक ठरतं.