तुम्ही कोणतं तेल वापरताय? तुम्ही वापरत असलेल्या तेलामध्ये किती प्रमाणात फॅट्स आहेत

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल उत्तम.

Updated: Nov 2, 2022, 06:17 PM IST
तुम्ही कोणतं तेल वापरताय? तुम्ही वापरत असलेल्या तेलामध्ये किती प्रमाणात फॅट्स आहेत title=

Oil for Cholesterol: फीट आणि फाईन राहायचं असेल तर डॉक्टर नेहमी आहारात तेल कमी घेण्याचा सल्ला देतात. इतकंच नाही तर रेग्युलर तेलाचा वापर करण्यापेक्षा डॉक्टर विविध तेलांचा पर्याय सुचवतात. तुमच्या आहारात तेलाचा वापर कमी केला तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. कारण अतिप्रमाणात तेलाचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका अधिक असतो. बाजारातील प्रत्येक तेल हे कोलेस्ट्रॉल मुक्त असल्याचा दावा केला जातो, मात्र यामध्ये किती सत्य याबाबत माहिती नसते. त्याचसाठी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल उत्तम.

कोलेस्ट्रॉल वाढणं का चिंताजनक?

लठ्ठ लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या अधिक असते. लठ्ठपणाची समस्या ही चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यांच्यामुळे जाणवते. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो, ज्यामुळे रक्तप्रवाह होण्यास परिणाम होतो. परिणामी हृदयविकाराचा झटका तसंच स्ट्रोक धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉलचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कोणतं तेल वापरावं?

तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स (MUFA) आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स (PUFAs) असतात. ते LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे HDL म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं. 

राईस ब्रान तेल

राईस ब्रान तेलामध्ये 44% मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि 34% पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असतं. त्याचा स्मोक पॉईंट 450 °F आहे. 

सोयाबीन तेल

सोयाबीन तेलामध्ये 25% मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि 60% पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असते. त्याचा स्मोक पॉईंट 450°F आहे. हे तेल डीप फ्रायसाठी योग्य मानलं जातं.

ऑलिव ऑईल

ऑलिव्ह ऑइलमध्ये 78% मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि 8% पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असते. त्याचा स्मोक पॉईंट 320°F-400°F आहे. मध्यम-उच्च आचेवरील गरम तेलाच अन्न अन्न शिजवता येतं. व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल फक्त मध्यम किंवा अगदी कमी आचेवर वापरलं जाऊ शकतं.

तीळाचं तेल

या तेलामध्ये 41% मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि 44% पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असतं. त्याचा स्मोक पॉईंट 350°F-450°F आहे.