Sleeping After Eating Food : जेवल्यानंतर झोप येण्यामागे आहे वैज्ञानिक कारण, तुम्हाला माहितीत आहे का?

Sleepiness After Lunch : एका संशोधनातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत. जेवल्यानंतर आळस, सुस्ती किंवा झोप या गोष्टी टाळायच्या असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

Updated: Nov 2, 2022, 03:47 PM IST
Sleeping After Eating Food : जेवल्यानंतर झोप येण्यामागे आहे वैज्ञानिक कारण, तुम्हाला माहितीत आहे का? title=
sleepy after eating what is the reason nmp

Feeling Sleepy After Lunch : सुट्टीच्या दिवशी मस्त दुपारचं जेवण करायचं आणि ताणून झोपायचं...नोकरीवर जाणाऱ्या अनेकांचं सुट्टीचा असाच काहीसा बेत असतो. पण अनेक वेळा आपण ऐकलं आहे आपल्या आजूबाजूला अनेक जण म्हणतात, दुपारचं जेवण (Lunch) जास्त नको,...अरे जास्त जेवण झालं की झोप (Rest) येते, आळस (Laziness) येतो...तर अनेक जण दुपारच्या जेवण्यात भात खात नाही, कारण झोप येते म्हणून...तर अनेक जण दुपारचं जेवण झाल्यावर चहा घेतात. कारण चहा घेतल्याने झोप पळते. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की, दुपारच्या जेवण्यानंतर झोप का येतं...आपल्याला सुस्त का वाटतं ते...तर यावर एक संशोधन करण्यात आलं आहे. त्या संशोधनात धक्कादायक कारण समोर आलं आहे, ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

काय आहे संशोधन?

जेवल्यानंतर झोप का येते याबद्दल फूड मार्बल (Food Marble) नावाच्या कंपनीनं संशोधन केलं. दुपारी जेवल्यानंतर आपल्याला सुस्त, आळशी का वाटतं...याबद्दल या कंपनीकडून संशोधन करण्यात आलं. आपण रोज जे अन्न खातो ते आपल्या आळशीपणाला, सुस्तीपणा कारणीभूत असतं, असा खुलासा समोर आला आहे.  (sleepy after eating what is the reason nmp)

हॉर्मोन्सची महत्त्वाची भूमिका

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरातली ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level)वाढते आणि नंतर वेगानं कमी होऊ लागते. या क्रियेमुळे थकवा (Fatigue) जाणवतो. यात हॉर्मोन्सदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. जेवल्यानंतर शरीरातलं सेरोटोनिन म्हणजेच फील गुड हॉर्मोन (Feel Good Hormone) झपाट्यानं वाढतं, यामुळे झोप येते, असं न्यूट्रिशन एक्सपर्ट आणि शास्त्रज्ञ डॉ. क्लेअर शॉर्ट यांनी हा निकर्ष काढला आहे. 

याही कारणामुळे येते झोप 

जर तुम्ही जे जेवण ग्रहण करता त्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अ‍ॅसिड असलेले पदार्थ जास्त असल्यास तुम्हाला झोप येते. अमिनो अ‍ॅसिड पदार्थ म्हणजे पनीर, अंडी, टोफू ज्यामध्ये उच्च प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये आढळते. याशिवाय ज्या पदार्थांमध्ये मेलाटोनिनचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुम्ही दुपारच्या आहारात उच्च फायबरयुक्त (High Fiber) पदार्थांचा समावेश करा. असं केल्यास तुम्हाला झोप, सुस्ती किंवा आळसपणाची समस्या जाणवणार नाही.