कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करण्याचे अफलातून फायदे !

अनेकजण सकाळी उठल्यावर ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात करतात. 

Updated: Jul 24, 2018, 04:42 PM IST
कोमट पाणी पिऊन  दिवसाची सुरूवात करण्याचे अफलातून फायदे ! title=

मुंबई : अनेकजण सकाळी उठल्यावर ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात करतात. कोमट पाणी प्यायल्याने तुम्हांला अधिक फायदा होऊ शकतो. हे ठाऊक आहे का ? सामान्यपणे दिवसाला 7-8 ग्लास पाणी पिणं गरजेचे आहे. शरीराला आवश्यक पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. सोबतच त्वचेचं सौंदर्य खुलते, घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते. 

सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे 

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने त्वचा आरोग्यदायी होते. पाण्यामुले रक्तामध्ये मिसळणारे अनेक घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे रक्त शुद्ध होते. त्वचा अधिक चमकदार होते. 

रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्यांचेही कार्य सुधारते. मसल्स  अधिक मजबूत होतात. 

कोमट पाण्यामुळे शरीराचे मेटॅबॉलिझम देखील सुधारते. त्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. 

नियमित कोमट पाण्याने दिवसाची सुरूवात केल्याने कॅन्सर, टीबी सारखे आजारांचा धोका कमी होतो. किडनी, युरिन इंफेक्शनचा त्रास कमी होण्यासही मदत होते. 

पोटदुखी, पोटात गॅस होणं, डोकेदुखी, उलट्या होणं अशा समस्यांवरही कोमट पाणी पिणं फायदेशीर आहे. 

सकाळी कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्याने रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास मदत होते. 

बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठीदेखील सकाळी कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरते.