गरोदरपणात वाढणार्‍या रक्तदाबाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे का?

 गरोदरपणी रुटीन चेक-अप दरम्यान अनेक महिलांना त्यांना gestational hypertension असल्याचे आढळून येते.

health.india.com | Updated: Aug 22, 2017, 09:00 PM IST
गरोदरपणात वाढणार्‍या रक्तदाबाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे का? title=

मुंबई : गरोदरपणी रुटीन चेक-अप दरम्यान अनेक महिलांना त्यांना gestational hypertension असल्याचे आढळून येते.

झेन हॉस्पिटलच्या गायनेकॉलॉजिस्ट डॉ.गौरी गोरे यांच्यामते या समस्येला Pregnancy-Induced Hypertension (PIH) असेही म्हणतात.या स्थितीत महिलांना मिड-प्रेगन्सीमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.उच्च रक्तदाब म्हणजे त्या स्त्रीचा रक्तदाब १४०/९० किंवा त्यापेक्षा अधिक नोंदविला जाणे.रक्तदाब वाढे पर्यंत याची कोणतीही इतर लक्षणे आढळत नाहीत.
कधी कधी जर या समस्येसोबत आणखी इतर काही लक्षणे आढळून आली तर ही Preeclampsia नावाची एक गंभीर स्थिती असू शकते.तसेच गर्भारपणात झालेला मधुमेह कसा नियंत्रित ठेवाल?हे देखील जरुर वाचा.
यासाठी Gestational hypertension विषयी या महत्वाच्या गोष्टी जरुर जाणून घ्या.

Gestational hypertension बाबत काळजी करणे का गरजेचे आहे?

ज्या गरोदर महिलांना Gestational hypertension ही समस्या असते त्यांनी गरोदरपणातील पुढील समस्या टाळण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.यासाठी डॉक्टर तुमचा रक्तदाब नियमित तपासून तो अचानक वाढणार नाही याची खात्री करुन घेत असतात.
ब-याच महिलांना सौम्य Gestational hypertension ही समस्या असते.मात्र ही समस्या तीव्र असल्यास त्याबाबत अधिक काळजी करण्याची गरज असते.उच्च रक्तदाबामुळे गर्भाची वाढीस प्रतिबंध येणे,वेळेआधीच बाळाचा जन्म होणे,गर्भाशयापासून गर्भवार वेगळी होणे,मृत बाळ जन्माला येणे या समस्या होऊ शकतात.तसेच अनियंत्रित Gestational hypertension मुळे सिझेरियन प्रसूती देखील करावी लागू शकते.
Gestational hypertension विकसित होण्याचा धोका नेमका कोणाला असतो?
ही समस्या वीस वर्षांच्या आतील व चाळीस वर्षांपेक्षा मोठ्या गर्भवती महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते.तसेच ज्या महिलांना गर्भधारणेआधी उच्च रक्तदाब किंवा किडनी विकार या समस्या असतात त्यांना देखील Gestational hypertension चा धोका असू शकतो.

Gestational hypertension ची लक्षणे काय असतात?
उच्च रक्तदाब,डोकेदुखी,चक्कर व थकवा,रक्तदाब वाढणे,अंधूक दृष्टी,मळमळ ही Gestational hypertension ची लक्षणे आहेत. अचानक चेहरा व हात-पायावर सूज येणे हे सामान्य असले तरी ते Gestational hypertension चे एक लक्षण असते.

या समस्येवर काय उपाय करावेत?
डॉक्टरांनी Gestational hypertension चे निदान केल्यावर ते तुम्हाला विश्रांती किंवा काही औषधे देऊन या स्थितीला नियंत्रित करण्याचा सल्ला देतात.बाळाचे आरोग्य तपासण्यासाठी डॉक्टर तुम्हाला अल्ट्रासाउंड टेस्ट करण्याचा देखील सल्ला देऊ शकतात.यासाठी आहारातून मीठ कमी करणे व हालचाल कमी करणे या गोष्टींचा देखील फायदा होऊ शकतो.ब-याचदा या स्थितीवर मात करण्यासाठी अशा गरोदर महिलांना बेड रेस्टचा सल्ला देण्यात येतो.

Gestational hypertension ही समस्या पूर्ण बरी होऊ शकते का?
गरोदरपणाचा कालावधी पूर्ण झाला की Gestational hypertension ही समस्या देखील बरी होते.पण कदाचित गरोदरपणाचा हा कालावधी ३७ आठवड्यांपेक्षा अधिक असण्याची देखील शक्यता असते.यासाठी गर्भाचा विकास व मातेची स्थिती यावर लक्ष ठेऊन प्रसूतीबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज असते.बाळाच्या जन्मानंतर मातेचा रक्तदाब मॉनिटर करुन मातेची आरोग्य स्थिती नक्कीच आटोक्यात आणता येते.ब-याचदा बाळंतपणानंतर काही आठवड्यांनी हा रक्तदाब आपोआप नॉर्मल होतो.