High Heels Knee Pain: उंच टाचांच्या चपला घातल्यावर पायदुखीचा त्रास सतावतोय? करा 'हे' घरगुती उपाय

High Heels Knee Pain शरीरात कॅल्शियमची (Calcium) कमतरता किंवा वाढत्या थंडीमुळेही घोट्यात दुखणे सुरू होते. 

Updated: Nov 21, 2022, 11:43 AM IST
High Heels Knee Pain: उंच टाचांच्या चपला घातल्यावर पायदुखीचा त्रास सतावतोय? करा 'हे' घरगुती उपाय title=

Knees Problem: आपण सर्वच महिला ऑफिसेसमध्ये फॅशन आणि स्टाईलिंगचा पुरेपुर वापर करून घेतो. त्यातून आपल्याला हाय हिल्स (High Heels) वापरणं तर आता आपल्यासाठी रूटिन झालं आहे. कामाच्या स्वरूपानूसार म्हणजे फॉर्मल लुक म्हणूनही आपल्याला हिल्स या अनेकदा घालाव्या लागतात. आपल्यासाठी आता हाय हिल्स हे एक फॅशन स्टेटमेंट (Fashion Statement) बनलं आहे. त्या परिधान करणंही आपल्याला अनेकदा आवडतं. परंतु आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला हाय हिल्स घालूनही अनेक संकंटांचा सामना करावा लागतो. जसं की टाचा दुखणं. पण अनेकदा टाचा दुखतायत (Knee Pain) याला फक्त हिल्स किंवा तशा चपला कारणीभूत ठरतं नाहीत तर याला अजूनही अनेक शारिरिक कारणं ्असतात. आजकाल बहुतेक लोकांना टाचदुखीचा त्रास होतो. ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते. वजन (Weight Gain) वाढणे, बराच वेळ उभे राहणे, नवीन व्यायाम (Excercise) सुरू करणे इत्यादी कारणे टाच दुखण्यामागे असू शकतात. याशिवाय शरीरात कॅल्शियमची (Calcium) कमतरता किंवा वाढत्या थंडीमुळेही घोट्यात दुखणे सुरू होते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय आणि व्यायामाबद्दल सांगणार आहोत. (what are the home remedies of knee pain while wearing high heels)

 

टाचांच्या दुखीसाठी व्यायाम (Exercise For Knee Pain)

  • टाचांच्या दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी फक्त तुम्ही व्यायाम करू शकता.
  • यासाठी सर्वप्रथम शरीराचा सर्व भार पायाच्या बोटांवर ठेवा.
  • त्यानंतर तुम्ही तुमची पायाची बोटं वर उचला आणि हा व्यायाम करण्यासाठी शरीर ताणा. सकाळी उठल्यानंतर (Morning Excercise) हा व्यायाम करावा. 

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

उस्त्रासन

  • उस्त्रासन (Ustrasan) हा व्यायाम देखील तुम्हाला टाचदुखीपासून मुक्त होण्यास खूप मदत करू शकतो.
  • यासाठी टाच जमिनीवर ठेवा आणि पायाची बोटे वरच्या बाजूस पसरवा.
  • हा व्यायाम पुन्हा एकदा करा.
  • असे केल्याने तुम्हाला लवकरच दुखण्यापासून आराम मिळेल.

घरगुती उपाय (Home Remedies)

  • टाचांच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आल्याचा डेकोक्शन (Decocation) पिऊ शकता. लवंगाच्या (Clove Oil) तेलामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म देखील आहेत.
  • या तेलाने मालिश केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो.
  • तुम्हाला हवे असल्यास गरम पाण्याच्या बादलीत मोहरीची (Mustard) छोटी वाटी टाका आणि मग त्यात पाय ठेवून बसा. यामुळे दुखण्यापासून आराम मिळेल.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)