मुंबई : पावसात जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग झपाट्याने पसरत आहेत. यामुळेच बहुतांश लोक पावसाळ्यातच आजारी पडतात. हवेतील आर्द्रता आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव हे देखील रोगांच्या प्रसाराचे कारण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देखील अद्याप पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. आपण हे पाहिलं असेल की, पावसाळा सुरु झाला की, लोकांना व्हायरल इन्फेक्शन्स होऊ लागतात, ज्यामुळे ताप, सर्दी, खोकला, नाक गळणे सुरु होतं. खरंतर ही व्हायरल इन्फेक्शन्सची लक्षणं आहेत.
परंतु यांची लक्षण लक्षात घेऊन जर सुरुवातीलाच तुम्ही सावध राहिलात, तर ही लक्षणं लवकर बरी होऊ शकतात. चला जाणून घेऊयात की आपल्याला अशी लक्षणं दिसल्यास काय करावं लागेल.
हा विषाणू मुख्यतः नाकातून शरीरावर हल्ला करतात. यानंतर ते घशात पोहोचतात आणि वरच्या श्वसन प्रणालीवर परिणाम करतात. शरीरात पोहोचून, ते विषाणू गुणाकार करतात आणि तुम्हाला आजारी बनवतात. शिंक येताच, आपल्यावा आळशीपणा जाणवतो किंवा थोडासा घसा खवखवल्यासारखे वाटते. तुम्हाले देखील असंच जाणवलं तर सर्वप्रथम, कोमट पाण्यात मीठ टाकून कुल्ला करा.
जर तुमच्याकडे Betadine Gargle असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता. त्यानंतर वाफ घ्या. औषधांचा विषाणूवर परिणाम होत नाही, त्यामुळे अँटिबायोटिक्स वगैरे घेऊ नका. तसेच तापाचे औषध लगेच घेऊ नका.
डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला ताप आला असेल, तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढत आहे. शरीर गरम केल्यावर विषाणू नष्ट होतात. तापमान वाढवून संसर्ग वाढण्यापासून रोखण्याचा हा शरीराचा मार्ग आहे. त्यामुळे, ताप कमी करण्यासाठी लगेच औषध घेऊ नका.
तापमानात ९९ फॅरेनहाइट वाढ होणे हा ताप मानला जात नाही. 100 पेक्षा जास्त तापमानाला ताप म्हणून गणले जाते. जर तुमचे तापमान 100 च्या वर जात असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तापाचे औषध घ्या.
झिंक, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी व्हायरस कमकुवत करतात. त्यामुळे आपण मल्टीविटामिन घेऊ शकता. त्यांचे नैसर्गिक स्त्रोत घेणे चांगले होईल. तुम्ही उन्हात बसू शकता, सुका मेवा खाऊ शकता आणि व्हिटॅमिन सी समृद्ध फळे खाऊ शकता. घसा दुखत असेल तर आंबट फळे, दही आणि सोडायुक्त पेये घेऊ नयेत. त्यापेक्षा कोमट पाणी आणि मध घ्या आणि भरपूर पाणी प्या.
तुम्ही ग्रीन टी देखील पिऊ शकता. मुळेथी हे नैसर्गिक विषाणूविरोधी मानले जाते. तुम्ही चहा, गरम पाणी किंवा ग्रीन टीम पिऊ शकता. अन्नामध्ये सूप, गरम पेय आणि अधिक प्रथिने घ्या. झोपताना हळद, काळी मिरी टाकून दूध घ्या आणि झोपण्यापूर्वी गार्गल करायला विसरू नका. ज्यामुळे तुम्ही या व्हायरल इन्फेक्शन्सपासून लांब राहू शकता, तसेच लवकर बरे होऊ शकता.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)