मुंबईकरांनो सावधान... कोरोना नंतर आता 'या' आजाराचं संकट

मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्या रुग्णांपैकी चार जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

Updated: Jul 21, 2022, 01:43 PM IST
मुंबईकरांनो सावधान... कोरोना नंतर आता 'या' आजाराचं संकट title=

मुंबई : कोरोनाचं संकट संपलं आणि मुंबईत स्वाईन फ्लूने डोकं वर काढलं आहे. यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत नक्कीच वाढ झाली आहे. मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्या रुग्णांपैकी चार जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.चालू महिन्यात स्वाईन फ्लू च्या 11 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मागच्या महिन्यात दोन रुग्णांची नोंद झाली होती.

त्याचबरोबर, ओपीडीमध्ये दररोज स्वाईन फ्लूची लागण झालेल्या किमान दोन ते तीन रुग्णांची नोंद करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. कोरोनाप्रमाणेच स्वाईन प्लू हादेखील श्वसनासंबंधातील आजार आहे. स्वाईन फ्लूचा धोका वाढल्यानं पालिकेच्या आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

काय आहेत लक्षणे?

ताप येणे, खोकला येणे, घशाला कोरड पडणे, अंग व डोकेदुखी आणि मळमळून उलट्या होणे ही स्वाईन फ्लूची प्रमुख लक्षणे आहेत.

काय आहेत उपाय ?

या रोगाची लागण आणि संसर्ग होऊ नये यासाठी नाक आणि तोंड मास्‍कने झाकून ठेवावं. सार्वजनिक स्‍वच्‍छता गृहाच्‍या नळाचा, गाडीच्‍या दरवाज्‍याचा, सायबर कॅफेवरील माऊस किंवा कीबोर्डचा वापर केल्‍यानंतर हात साबणाने वरचेवर स्‍वच्‍छ करावेत. तसेच, तुळशीच्‍या पानांचा किंवा मंजुळ्यांचा चहा घेतल्‍यास या आजाराची लागण होण्‍याची शक्यता कमी असते.

स्‍वाइन फ्ल्‍यू अतिसंसर्गजन्‍य आहे किंवा नाही हे अजून वैज्ञानिक दृष्‍ट्या सिध्‍द झालं नसलं तरीही सामान्‍य फ्ल्‍यू प्रमाणे त्याचा फैलाव होत असल्‍याने त्‍याला संसर्गजन्‍य म्‍हटलं जातय. फ्ल्‍यूचा विषाणू बाहेरच्या वातावरणातही बराच वेळ तग धरून राहू शकतो.