या फळाची साल करेल जादू.पिंपल्स होतील मुळापासून गायब..कधीच येणार नाहीत परत..

याचे कुठलेही साईट इफेक्ट्स होत नाहीत आणि तुमच्या खिशाला परवडणारा हा उपाय आहे 

Updated: Jul 31, 2022, 04:20 PM IST
या फळाची साल करेल जादू.पिंपल्स होतील मुळापासून गायब..कधीच येणार नाहीत परत..  title=

HOME REMEDY FOR ACNE,PIMPLE:   पिंपल्स ही स्किनसंदर्भातील सर्वसामान्य समस्या आहे ज्यामुळे स्किन निस्तेज दिसू लागते चारचौघात आपल्याला आत्मविश्वास कमी वाटू लागतो..बरेच ट्रीटमेंट करूनसुद्धा पिंपल्स पुन्हा येऊ लागतात. अशा वेळी काय करावं हे सुचत नाही पिंपल्स जावे म्हणून आपण पार्लर्स मध्ये जातो बरेच पैसे खर्च करतो मात्र तरीही काहीच होत नसेल तर काही घरगुती उपाय अशावेळी कामी येऊ शकतात .. 
 केळं हे फळ बारमाही फळ म्हणून ओळखलं जात आपल्या सर्वांच्या घरात हे फळ असतंच याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत हे आपण जाणतोच मात्र स्किनसंदर्भात विशेतः पिंपल्स असतील तर केळ्याचे खूप फायदे आहेत केळ्याची साल एखाद्या जादूप्रमाणे काम करेल आणि तुमची स्किन चेहरा नितळ होऊ लागेल 

कशी वापरायची केळ्याची साल 

चेहऱ्यावर केळ्याची साल घासा 

पिंपल्स घालवण्यासाठी केल्याची साल चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिट हळुवार घासावी त्यांनतर अर्धा तास चेहरा तसाच ठेवावा त्यांनतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करावा याने पिम्पल्सची समस्या कमी होण्यास खूप मदत होईल 

ओट्स आणि केळ्याच्या सालीचं स्क्रब 

सर्वप्रथम केल्याची साल मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावी त्यात ओट्समिल आणि साखर घालून मिश्रण तयार करावे त्यांनतर चेहरा स्वच्छ धुवून त्यावर हलक्या हाताने मसाज करावा त्यांनतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करावा हा उपाय केल्यांनतर मॉइस्चरायझर लावायला विसरू नका 

केळ्याची साल आणि  लिंबू 

केल्याची साल मिक्सर मध्ये वाटून घ्यावी त्यात लिंबाचे काही थेंब घालावेत आणि ही पेस्ट चेहऱ्यावर मानेवर लावावी ,पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ करावा याने पिम्पल्सना कारणीभूत असणारे बॅक्टरीया मारले जातील आणि पुन्हा पिंपल्स येण्याची शक्यता कमी होईल 

घरच्या घरी अगदी स्वस्तात हा उपाय करू शकता याचे कुठलेही साईट इफेक्ट्स होत नाहीत आणि तुमच्या खिशाला परवडणारा हा उपाय आहे ..मात्र चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट जरूर करावी