मुंबई : असं म्हणतात की, सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे. जो आपल्याला संपूर्ण दिवस आनंदी राहण्यासाठी मदत करतो. परंतु काही वेळा वेळेच्या कमतरतेमुळे काही लोक नाश्ता करणे टाळतात. तर काही लोक वजन वाढतं, म्हणून नाश्ता करणं टाळतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, हेल्दी ब्रेकफास्ट करणे खूप गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नाश्त्यात काय खाता, हे तुमची हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. वृकारण हेल्दी ब्रेकफास्ट तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवू शकतो. नाश्त्यामध्ये नेहमी आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करावा.
ऍसिडिटी
शरीरातील चयापचय मंद होऊ शकतो
जास्त खाण्याची समस्या
ऊर्जेचा अभाव
मधुमेहाचा धोका
अशा परिस्थीत नाष्ट्याला काय खावं, ज्यामुळे आपलं शरीर निरोगी राहिल, हे जाणून घ्या
तुम्ही जर मांसाहारी असाल, तर तुम्ही तुमच्या नाश्त्यात अंडी घालू शकता. अंडी हा प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो आणि जर तुम्ही शाकाहारी असाल, तर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही इत्यादींचा नाष्ट्यात सेवन करू शकता. दुग्धजन्य पदार्थांमध्ये पोषक तत्वे असतात
नाष्ट्यात ताजी फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. रसाच्या स्वरूपात देखील तुम्ही फळांना आराहात समाविष्ट करू शकता. तसेच तुम्ही भाज्या उकडून आणि वाफवून खाऊ शकता. यामुळे वजन नियंत्रित राहते आणि शरीर दिवसभर ऊर्जावान राहते.
जर तुम्हाला दक्षिण भारतीय जेवणाची आवड असेल, तर तुम्ही उपमा खाऊ शकता पण, जर तुम्हाला उपमा खायला आवडत नसेल तर तुम्ही नाश्त्यात पोहे खाऊ शकता. या दोन्ही गोष्टी हलक्या आणि आरोग्यदायी आहेत, ज्याच्या मदतीने वजनही नियंत्रणात ठेवता येते.