'हे' सूपरफुड्स वाढवतील स्पर्म काऊंट

फर्टिलीटी डाएट महिलांप्रमाणे पुरुषांसाठीही महत्त्वाचा असतो.

Updated: Jun 9, 2021, 03:17 PM IST
'हे' सूपरफुड्स वाढवतील स्पर्म काऊंट title=

तुम्ही जे खाणं खाता त्याचा तुमच्या फर्टीलीटीवर परिणाम होतो. फर्टिलीटी डाएट महिलांप्रमाणे पुरुषांसाठीही महत्त्वाचा असतो. काही पदार्थ स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतात. जाणून घेऊया या खाद्यपदार्थांबाबत...

भोपळ्याच्या बीया

भोपळ्याच्या बीयांमध्ये झिंकचं प्रमाण असतं. झिंक पुरुषांमधील फर्टीलीटी वाढवण्यासाठी एक जरूरी मिनरल्सपैकी एक आहे. हे टेस्टोस्टेरोन, स्पर्म मोटिलीटी आणि स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

संत्र

संत्र्यामध्ये व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात असतं. तसंच अनेक अभ्यासांच्या माध्यमातून व्हिटॅमीन सी स्पर्म मोटीलीटी, काऊंट सुधारण्यास मदत करत असल्याचं समोर आलंय. संत्र्यासोबत व्हिटॅमीन सी असलेले अन्य पदार्थ जसं टोमॅटो, ब्रोकोली यांचा देखील आहारात समावेश करावा.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये आर्जिनिन नावाचं अमिनो अॅसिड असतं. हे स्पर्म काऊंट तसंच क्वॉलिटी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

डाळिंब्याचा रस

डाळिंब्याच्या रसात असणारं अँटीऑक्सिडंट टेस्टोस्टेरोनच्या स्तरामध्ये सुधार करण्यासाठी फायदेशीर असतं. यामुळे पुरुषांची लैंगिक इच्छा वाढते आणि स्पर्म्सचा विकास चांगल्या पद्धतीने होतो. 

पाणी

शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचं स्पर्म्सवर परिणाम होताना दिसतो. हायड्रेट राहिल्याने चांगल्या सेमिनल फ्लूइड बनण्यास मदत मिळते.

वर नमूद केलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास स्पर्मची क्वालिटी चांगली राहते. तर काही खाद्यपदार्थांमुळे ही क्वॉलिटी खराबंही होते. त्यामुळे या खाद्यपदार्थांपासून दूर राहिलेलं उत्तम

फ्राईड फूड

फ्राईड फूड पचवणं थोडं कठीण असतं. यामुळे स्पर्म क्वॉलिटीवर परिणाम होऊ शकतो. 

फॅट डेअरी प्रोडक्ट

फॅट डेअरी प्रोडक्टमध्ये एस्ट्रोजन असतं. आणि हे हेल्थी स्पर्मला कमी करण्याचं काम करतं.

कॅफेन

काही अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की, कॅफेनचा जास्त वापर महिला आणि पुरुषांच्या फर्टिलीटीवर परिणाम करतं. कॅफेनची जास्त मात्रा गर्भपाताचा धोका उद्भवू शकतो.

दारू

एक किंवा दोन डिंक्स ठीक आहेत. मात्र आठवड्यात 14 पेक्षा अधिक ड्रिंक्स तुमच्या टेस्टोस्टोरोनचा स्तर कमी करतं. याशिवाय जास्त मद्यसेवन स्पर्म काऊंट कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतो.