श्रीदेवी यांच्या मृतदेहावर झाली ‘एम्बाल्मिंग’ प्रक्रिया

सुपरस्टार श्रीदेवी या आज जगाचा निरोप घेणार 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 28, 2018, 12:13 PM IST
श्रीदेवी यांच्या मृतदेहावर झाली ‘एम्बाल्मिंग’ प्रक्रिया title=

मुंबई : सुपरस्टार श्रीदेवी या आज जगाचा निरोप घेणार 

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी ही धक्कादायक होती. 72 तासानंतर दुबईहून श्रीदेवी यांच पार्थिव मुंबईत आणण्यात आलं. 24 तारखेला निधन झालेल्या श्रीदेवीवर आज विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार होणार आहे. आता अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने चाहते आणि सेलिब्रिट उपस्थित होते. निधनानंतर तब्बल तीन दिवसांनी श्रीदेवी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

पार्थिव मुंबईत आणण्या अगोदर श्रीदेवी यांच्या पार्थिवावर ‘एम्बाल्मिंग’ प्रक्रिया करण्यात आली आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात पार्थिव घेऊन जाण्याआधी ‘एम्बाल्मिंग’ प्रक्रिया करावी लागते. पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी जर अधिक कालावधी लागणार असेल तर त्यावर एम्बाल्मिंग केले जाते. 

‘एम्बाल्मिंग’ म्हणजे काय?

‘एम्बाल्मिंग’चा सोप्पा अर्थ म्हणजे पार्थिव शरीरावर लेप लावणं
जेणेकरून पार्थिव शरीर काही काळाकरता योग्य स्थितीत राहू शकतं
पार्थिव शरीर खराब होऊ नये यासाठी ही प्रक्रिया केली जाते
डॉक्टरांनाच ‘एम्बाल्मिंग’ करण्याची परवानगी
‘एम्बाल्मिंग’चे दोन प्रकार आर्टिरिअल आणि कॅव्हिटी

कशी होते ‘एम्बाल्मिंग’ प्रक्रिया

आर्टिरिअलमध्ये रक्ताच्या जागी शरीरात एक द्रव पदार्थ भरला जातो
‘एम्बाल्मिंग’ प्रक्रिया करण्याआधी पार्थिव शरीर स्वच्छ धुतलं जातं
सांधे घट्ट झालेले असतात त्यामुळे मसाज केला जातो
आर्टिरिअर ‘एम्बाल्मिंग’ मध्ये रक्तवाहिन्यातून रक्त काढलं जातं आणि द्रव पदार्थ भरला जातो

 “एखाद्या व्यक्तीच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असेल तर शक्यतो कॅव्हिटी ‘एम्बाल्मिंग’ केलं जातं. ज्यात शरीरात इंजेक्शनद्वारे द्रव पदार्थ सोडला जातो. हात, पाय आणि सांध्यातही हा द्रव पदार्थ भरला जातो जेणेकरून शरीर डिकंपोज म्हणजेच खराब होणार नाही.”