Skin disorder : आयुर्वेदानुसार त्वचा संदर्भात समस्या असल्यास हे पदार्थ खाणे टाळावे

Skin Problem : त्वचा संदर्भात कोणत्याही समस्या असल्यास हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

Updated: Jun 14, 2022, 02:16 PM IST
Skin disorder : आयुर्वेदानुसार त्वचा संदर्भात समस्या असल्यास हे पदार्थ खाणे टाळावे title=

Skin disorder : त्वचारोग आज अनेकांसाठी समस्या बनत चालली आहे. हा अंतर्गत आणि बाह्य संसर्गामुळे होतो. त्वचारोग अनेक प्रकारचे असतात. उन्हाळ्यात जवळजवळ प्रत्येकाला खाज, पुरळ यासारख्या त्वचेशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्याचा धोका टाळता येतो.

त्वचेची समस्या टाळण्यासाठी आयुर्वेद तज्ञांनी 5 प्रकारचे अन्न टाळायला सांगितले आहे. संक्रमण, ऍलर्जी, रसायने (मेकअप उत्पादने), कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. खरुज, खाज, सोरायसिस, पांढरे डाग बहुतेक त्वचेच्या आजारांमध्ये उद्भवतात. त्वचाविकार हे कधीकधी महिलांमध्ये नैराश्याचे कारण बनतात. त्वचेशी संबंधित आजारांवर उपचार शक्य असले तरी ते पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो.

आयुर्वेद डॉक्टर वैशाली यांनी त्वचेच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी काही सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत. त्वचेचे आजार लवकर दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टी आहारातून टाळल्या पाहिजेत. त्वचेशी संबंधित आजार पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो. या दरम्यान तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. अशा स्थितीत त्वचाविकार असलेल्या रुग्णांनी काही पदार्थ खाणे टाळावे.

मसालेदार आणि जंक फूड

डॉक्टर वैशाली सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला त्वचेचे आजार होत असतील तर त्याने मसालेदार आणि जंक फूड खाणे टाळावे. हे पदार्थ शरीरात दीर्घकाळ राहतात आणि चयापचय प्रक्रियेत व्यत्यय आणतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात.

दुग्धजन्य पदार्थ

आयुर्वेदानुसार त्वचेशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी दूध, दही, लोणी यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये. ते पचायला जास्त वेळ लागतो. ज्याचा परिणाम त्वचेवर अनेक प्रकारे दिसून येतो.

आंबट पदार्थ समस्या वाढवू शकते

आयुर्वेद तज्ञ सांगतात की आयुर्वेदानुसार आंबट पदार्थ शरीरात पित्त वाढवतात. शरीरात पित्ताचे जास्त प्रमाण रक्त अशुद्ध करण्याचे काम करते. त्याचा परिणाम त्वचेशी संबंधित आजारांमध्ये दिसून येतो.

तिळाचे सेवन टाळावे

त्वचेशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी तिळाचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. याच्या अतिरेकामुळे पचनसंस्थेमध्ये असंतुलन आणि शरीरातील पोटावरील चरबी वाढू शकते.

गुळाचे सेवनही टाळावे

आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की, आयुर्वेदानुसार गुळाच्या सेवनाने त्वचारोगाच्या रुग्णांनाही त्रास होऊ शकतो. गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. त्याचा अतिरेक देखील आंबट पदार्थांप्रमाणे अशुद्ध रक्त म्हणून काम करतो.