लंडन : भारतासह जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता पुन्हा एक नवीन टेन्शन वाढलं आहे. मंकीपॉक्सने जगाचं आणि तज्ज्ञांचं टेन्शन वाढवलं आहे. मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटना आणि तज्ज्ञांनी अलर्ट जारी केला आहे.
ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्सचे 470 रुग्ण आढळले आहेत. 104 नव्याने रुग्ण सापडल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बायसेक्शुअल पुरुषांना अधिक धोका असल्याचं आढळून आलं.
जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार 28 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 1,285 रुग्ण समोर आले आहेत. अजूनतरी आफ्रिका सोडून इतर देशांमध्ये मंकीपॉक्समुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. त्यामुळे ती एक दिलासादायक बाब म्हणायला हरकत नाही. मात्र तरीही मंकीपॉक्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
ब्रिटन पाठोपाठ स्पेन, जर्मनी आणि कॅनडामध्ये सर्वात जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मंकीपॉक्सची लक्षणं कोणती आहेत जाणून घेऊया.
मंकीपॉक्स संसर्गाची लक्षणे साधारणपणे 6 ते 13 दिवसात दिसू लागतात, परंतु ते 5 ते 21 दिवसांपर्यंत ते असू शकतात. ताप, तीव्र डोकेदुखी, सुजलेल्या लिम्फ नोड्स, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि अशक्तपणा यासारखी लक्षणं यामध्ये आढळतात.
त्वचेचा त्रास सामान्यतः ताप आल्यानंतर 1 ते 3 दिवसांच्या आत सुरू होतो. पुरळ घशापेक्षा चेहऱ्यावर आणि हातपायांवर जास्त केंद्रित असते. हे मुख्यतः चेहरा आणि हाताचे तळवे आणि पायांच्या तळवे प्रभावित करते.