शाहरुख खान रुग्णालयात दाखल पण त्याला झालंय काय? जाणून घ्या त्याला झालेल्या आजाराची लक्षणं

What Happened To Shah Rukh Khan Why He Is Admitted In Hopsital: शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होता. मात्र बुधवारी दुपारी त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 23, 2024, 11:07 AM IST
शाहरुख खान रुग्णालयात दाखल पण त्याला झालंय काय? जाणून घ्या त्याला झालेल्या आजाराची लक्षणं title=
गौरी खान अहमदाबादला पोहोचली (प्रातिनिधिक फोटो)

What Happened To Shah Rukh Khan Why He Is Admitted In Hopsital: अभिनेता शाहरुख खानला अहमदाबादमधील केडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. इंडियन प्रिमिअर लीगच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी संघ मालक असलेला शाहरुख अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होता. शाहरुखला दुपारी 2 च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून शाहरुखची पत्नी गौरी खानही अहमदाबादमध्ये दाखल झाली आहे. केडी रुग्णालयातील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. मात्र शाहरुखला नेमकं काय झालं आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर शाहरुखला कोलकाता विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उष्माघाताचा म्हणजेच हीट स्ट्रोकचा त्रास झाला. उष्माघात म्हणजे काय आणि त्याची लक्षणं काय आहेत हे पाहूयात...

शाहरुखला झालेल्या आजारात होतं तरी काय?

उष्णतेशी संबंधित सर्वात गंभीर समस्येपैकी एक म्हणजे उष्माघात! उष्माघातामध्ये नेमकं होतं काय असा प्रश्न पडला असेल तर अगदी साध्या भाषेत सांगायचं झाल्यास, जेव्हा शरीरला तापमान नियंत्रित ठेवता येत नाही तेव्हा उष्माघाताचा त्रास झाला असं म्हणतात. उष्माघाताचा त्रास होतो तेव्हा शरीराचे तापमान वेगाने वाढते. घाम येत नाही. घाम न आल्याने शरीर थंड होत नाही. जेव्हा उष्माघात होतो, तेव्हा शरीराचे तापमान 10 ते 15 मिनिटांत 40 सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढू शकते. उष्माघाताचा त्रास झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यास व्यक्तीला कायमचे अपंगत्व येऊ शकतं किंवा मृत्यूही होऊ शकतो.

लक्षणं कोणती?

> गोंधळ उडणे, बोलताना अस्पष्ट उच्चार
> भान हरपणे म्हणजेच कोमात जाणे
> त्वचेचं तापमान वाढणे किंवा कोरडी पडणे 
> घामच न येणे किंवा अचानक भरपूर घाम येणे
> आकडी येणे
> अगदी काही वेळात शरीराचं तापमान भरपूर वाढणे

प्रथमोपचार

वेळेत उपचार मिळाले नाही तर उष्माघाताचा झटका प्राणघातक ठरु शकतो. प्रथमोपचार म्हणून काय करता येईल समजून घेऊयात...

> आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी 112 या रुग्णवाहिकेसाठीच्या क्रमांकावर फोन करा
> आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत उष्माघाताचा झटका आलेल्या व्यक्तीसोबतच थांबा
> उष्माघाताचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी किंवा थंड ठिकाणी हलवा.
> उष्माघाताचा झटका आलेल्या व्यक्तीच्या अंगवारील कपडे सैल करा. त्याच्या शरीराला हवा लागेल असं पाहा.
> एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा झटका आल्यास त्याच्या शरीरावरुन थंड पाण्यात भिजवलेलं कापड फिरवावं.
> शक्य असल्यास थंड पाणी शरीरावर ओतावे.
> उष्माघाताचा झटका आलेल्या व्यक्तीची त्वचा ओली राहील असा प्रयत्न करा.
> अगदीच अंघोळ शक्य नसेल तर त्वचेवर थंड ओले कापड ठेवा.
> उष्माघाताचा झटका आलेल्या व्यक्तीच्या आजूबाजूला गर्दी करु नका. त्यांना सतत हवा घालत राहा.
> वैद्यकीय मदत येईपर्यंत अशा व्यक्तींच्या डोके, मान, बगल आणि मांडीवर थंड ओले कपडे किंवा बर्फ ठेवा अथवा त्याची कपडे पाण्याने भिजवा, जेणेकरुन त्याच्या शरीराला थंडावा मिळेल.